अहमदनगर पत्रकारांशी केली चर्चा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर ः अहमदनगर शहरात २५ वर्षापेक्षा अधिक काळ नामांकित दैनिकात छायाचित्रकार म्हणून काम केले. १८ वर्ष अधिस्विकृतीधारक पत्रकार राहिलेले स्व. जितेंद्र अग्रवाल यांना राज्य शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून एक लाख रुपयांची मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. पत्रकार कल्याण संघही मदत करेल, असे महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले.
अहमदनगर येथे सरकारी विश्रामगृहावर महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचा नगरमधील पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच स्व. जितेंद्र अग्रवाल यांना मदत मिळावी याबाबत चर्चा केली. अहमदनगर प्रेस क्लबचे कार्यकारिणी सदस्य,पत्रकार निशांत दातीर, छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष दत्ता इंगळे, टीव्ही 9 चे प्रतिनिधी कुणाल जयकर, सकाळ-अॅग्रोवनचे जिल्हाप्रतिनिधी सूर्यकांत नेटके, अमित आवारी, उर्दू मखदुम चे संपादक आबीदखान दुलेखान , नगरवेध चे संपादक संदीप दिवटे, स्वानंद पिंपुटकर,अमर बामदळे आदी उपस्थित होते. यावेळी निशांत दातीर, दत्ता इंगळे व अन्य पत्रकारांनी स्व. जितेंद्र अग्रवाल यांच्या कुटूंबाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली. बेडकिहाळ म्हणाले, जो पत्रकार अधिस्विकृधारक आहे व त्याचे आकत्मात निधन झाले तर त्या पत्रकाराच्या कुटूंबाला शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतुन एक लाख रुपये मदत देण्याची तरतुद आहे. त्यासाठी मी स्वतः मंत्रालयात पाठपुरावा करेल. त्यासाठी महिती विभागाकडून अर्ज करा. तसेच आपल्या पत्रकार कल्याण संघाकडूनही त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत करेल असे सांगितले.