संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी: विद्यार्थी दशेपासून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष वाढीसाठी एक निष्ठेने काम करुन मोठे योगदान दिले. देशपातळीवर पक्षाला नेण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या संघर्ष याचा बहुमोल कार्याचा वसा असाच पुढे कार्यकर्त्यांनी चालू ठेवावा असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
पाथर्डी शहरातील वसंतराव नाईक चौकात स्व गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी राजळे बोलत होत्या.प्रारंभी आमदार राजळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड,तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे,उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, जि.प.सदस्य राहुल राजळे,अशोक चोरमले,राहुल कारखेले,बंडू बोरुडे,पांडुरंग सोनटक्के,पंचायत समिती सदस्य विष्णूपंत अकोलकर,सुनील ओव्हळ, नगरसेवक रमेश गोरे,बजरंग घोडके, महेश बोरुडे,रमेश हंडाळ, रमेश काटे, डॉ सुहास उरणकर, डॉ जगदीश मूने, संदिप पवार, जमीर आतार,नितीन गर्जे,बबन बुचकुल, बाबसाहेब दहिफळे,भगवान साठे आदींसह अनेक मुंडे प्रेमींनी स्व मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमानंतर आमदार मोनिका राजळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते परळी येथील गोपीनाथ गडावर स्व मुंडे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले.त्यानंतर आमदार राजळे माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या समवेत ऊसतोडणी कामगारांच्या आयोजित कार्यक्रमासाठी सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी करुन जे बी वांढेकर यांनी आभार मानले.
दरम्यान शिवसेनेच्या वतीने स्व मुंडे यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार,शिक्षकसेनेचे तालुकध्यक्ष नंदकुमार डाळींबकर,संतोष मेघुंडे,सचिन नागपुरे आदी उपस्थित होते. दरम्यान लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती अकोला येथील संत भगवानबाबा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात साजरी करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब गर्जे,खरेदी-विक्री संघाचे संचालक गंगाधर गर्जे,राजेंद्र पालवे, देवढे , दादा एकसिंगे,विष्णू एकशिंगे आदी उपस्थित होते.