👉संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शेवगाव – शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळ स्वतःची संपत्ती गहाण ठेवणारा केदारेश्वरचे हे राज्यातील एकमेव उदाहरण असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ तात्यासाहेब लहाने यांनी व्यक्त केले.
संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन जेष्ठ संचालक माधवराव काटे व त्यांच्या सुविध पत्नी मंगल काटे यांच्या हस्ते तर गळीत हंगामाचा शुभारंभ पद्मश्री नेत्रतज्ञ डॉ तात्यासाहेब लहाने, हभप राधाताई सानप श्री क्षेत्र मीराबाई संस्थान महासांगवी यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत व कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाला.
यावेळी बोलताना डॉ लहाने म्हणाले बबनराव ढाकणे यांनी दुसऱ्यांच्या हितासाठी सर्वस्व पणाला लावून ऊसतोडणी कामगारांच्या मालकीचा हा कारखाना उभा केला जिद्ध व मेहनत केली तर कोणत्याही क्षेत्रात प्रगती होते, सामाजिक क्षेत्रात जिथे विज्ञान संपते तेथे अध्यात्मिक काम करते. दुसऱ्यासाठी जगले पाहिजे. दुसऱ्याचा विचार करण्याचा प्रयत्न ढाकणे परिवाराने सामाजिक क्षेत्रात केला आहे कोणत्याही क्षेत्रात प्रगतीसाठी इच्छाशक्ती अत्यंत महत्वाची असल्याचे सांगून कोरोनाची तिसरी लाट तीव्र येणार नाही. मात्र नियम पाळून काळजी घ्यावी असा सल्ला दिला तर भाषणात सामान्य कुटुंबातून जीवनाचा इतिहास उलगडून दाखवला गेला आईवडिलांना आश्रमात पाठवू नका त्याची सेवा करा असा सल्ला यावेळी दिला.
यावेळी बोलताना श्री ढाकणे म्हणाले, चालू हंगामात अतिरिक्त ऊसाचे मोठे आव्हान आहे सर्वांना मोठ्या जिद्दीने संघटितपणे सामोरे जावे लागणार आहे, सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट हाती घेतले आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले अजून शासकीय मदत मिळाली नाही मात्र शेतकऱ्यांना आता ऊसच एकमेव पीक शिल्लक राहिल्याने भविष्यात ऊसाचे क्षेत्र वाढणार आहे ते आव्हान सर्वांना एकत्रितपणे पेलवावे लागणार आहे. कामगारांना चालू गळीत हंगामात कामगारांना १० टक्के पगार वाढ करण्यात येणार असल्याचे यावेळी श्री ढाकणे यांनी जाहीर केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे म्हणाले थकबाकी असल्याने कोणत्याच बँकेने कर्ज दिले नाही मात्र अडचणीत बुलढाणा बँकेने कर्ज उपलब्ध केले आहे, नोंदणी केलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप झाल्या शिवाय हंगाम बंद करणार नाही असे सांगितले.
प्रास्तविक तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष डॉ प्रकाश घनवट, महंत राधाताई सानप, प्रभाकर कोलते विभागीय व्यवस्थापक बुलढाणा बँक यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमास ॲड सिद्धेश ढाकणे, मयूर बंब चार्टर्ड अकाउंटंट, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, नगरसेवक बंडू बोरुडे, गहिनीनाथ सिरसाट, शिवसेनेचे रफिक शेख, बंटी जगताप, सतीश जगताप, डॉ दीपक देशमुख, उद्धव दुसंगे, राजेंद्र नागरे, महारुद्र कीर्तने, हुमायम आत्तार, बाबासाहेब ढाकणे, योगेश रासने, प्रभाकर हुंडेकरी, सुधाकर तहकीक, पिंपळगाव टप्पाचे सरपंच पांडुरंग शिरसाट, यादव क्षिरसागर, रामजी अंधारे, भाऊराव भोंगळे, प्रमोद विखे,गहिनीनाथ बडे, ऍड संजय सानप, संचालक सुरेशचंद्र होळकर, विनोद प्रसाद, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, यांच्यासह संचालक व सभासद शेतकरी कामगार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक तुषार वैद्य यांनी मानले.
( संकलन: बाळासाहेब खेडकर )