संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – प्रभाग 15 मधील अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे, अवेळी पाणी पुरवठा, अस्वच्छ पाणी पुरवठा तसेच काटवन खंडोबा परिसरात पिण्याच्या पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे आदि पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारी महापौर रोहिणी शेंडगे यांची भेट घेऊन प्रभागातील पाणी प्रश्नांबाबत चर्चा केली. याप्रसंगी नगरसेवक अनिल शिंदे, दत्ता जाधव, दिपक खैरे, प्रशात गायकवाड आदि उपस्थित होते. यावेळी गेल्या 5-6 महिन्यांपासून आगरकर मळा, स्टेशन रोड, काटवन खंडोबा आदि भागातील पाणी पुरवठ्याबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत नगरसेवकांनी पाणी पुरवठा विभागाला वेळोवेळी कळविले परंतु ठोस उपाययोजना होत नाही. त्यासाठीच आज महापौरांसमवेत याबाबत प्रभागातील पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा करुन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या भागात उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने त्यासाठी वारंवार रस्ता खोदला जात आहे, पाण्याच्या लाईनची शिफ्टींग होत आहे, रस्ता खोदल्याने जड वाहनांनी पाईपलाईन वारंवार फुटत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या या समस्यांमुळे पाणी पुरवठ्याबाबत दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महापौरांनी लक्ष घालावे, अशी मागणी या भागातील नगरसेविकांनी एकत्रित केली.
याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे यांनी याबाबत नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित अधिकार्यांना या समस्येबाबत काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा घेऊन तातडीने त्या कराव्यात, असे असे आदेश दिले.
यावेळी नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे, अनिल बोरुडे आदि उपस्थित होते.