सौरभ केदारचा ‘कृषीथॉन युवा सन्मान पुरस्कार-२०२२’ ने आ.पवारांच्या हस्ते सन्मान

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी:
भारतातील अनेक कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे कृषी प्राध्यापक, विचारवंत, संशोधक, कृषिवेत्ते, कृषी उद्योजक हे सर्व कृषी अभ्यासाबरोबर कृषी विस्तारासह, कृषी संशोधनांचे कार्य करत उद्याच्या कृषिप्रधान देशाचे भविष्य घडवत असतात. अशा मान्यवरांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या कार्याला सलामी देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषीथॉन’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनामध्ये नाशिक येथे प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये ‘कृषीथॉन युवा सन्मान पुरस्कार-२०२२’ हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.यात हात्राळ-सैदापूर (त.पाथर्डी) येथील सौरभ सुभाष केदार ‘प्रयोगशील युवा संशोधक पुरस्कार-२०२२’ देऊन सन्मानित करण्यात आले.

सौरभ गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्था (डॉ.बा.आं.म.वि.) औरंगाबाद येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षणादरम्यान त्याने अनेक दैनिकामधून कृषी विषयांवर लेख विविध लेख प्रकशित करत. वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांमधील कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवत, कृषी जनजागृती आणि साहित्य संवर्धनासाठी वेगवेगळ्या ब्लॉग्सच्या माध्यमातून कार्य करणारा सौरभ परिवारासोबत शेतीमध्ये काम करतो.
कृषिविषयक कार्य आणि वेगवेगळे संशोधन सादरीकरण, तसेच विश्वविक्रमाला घातलेली गवसणी यासर्व गोष्टींची दखल घेत सौरभला नुकताच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे, कृषीथॉन चे आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर यांच्या हस्ते ‘प्रयोगशील युवा संशोधक पुरस्कार-२०२२’ देऊन सन्मानित करण्यात आले.
आई कुशीवर्ता, वडील सुभाष केदार आणि चुलते संजय केदार, डॉ. मोनाली लकडे, डॉ. सुनील गलाटे, प्रा. प्रेरणा अभंग, प्रा. अतुल तिवारी यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे यश अशक्य असल्याचे सौरभने म्हटले आहे..
सौरभच्या उत्तुंग कामगिरी निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे कुलसचिव डॉ. भगवान साखळे, डॉ. जे.जे. हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी कौतुक केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!