सोमवारपासून अनलाॅक प्रक्रियेला प्रारंभ ; राज्य सरकारकडून नियमावली जाहीर


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

मुंबई : राज्यामध्ये सोमवार (दि.७) पासून अनलॉक प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.अनलॉक करत असताना 5 स्तर तयार करण्यात आले आहेत. 
पहिल्या स्तरात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या स्तरात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरांमध्ये फक्त दोन जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एक ही जिल्हा नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. 

👉टप्पा – 1 औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश असेल. या 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सर्व सेवा सुरळीत राहणार आहेत.
👉टप्पा – 2 अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर आणि उपनगर, नंदुरबार, या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरामध्ये मुंबईचा समावेश होतोय. त्यामुळे मुंबईसह इतर पाच जिल्ह्यात खालील नियम लागू राहतीलमुंबईसह या पाच जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता लोकल सेवा बंद राहील.
50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू राहतील
📥 मॉल्स आणि सिनेमगृह 50 टक्के सुरू राहतील
📥 सार्वजनिक जागा , मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील
📥 बांधकाम क्षेत्रातील पूर्ण कामे सुरू राहतील
📥 कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरू राहतील
📥 ई सेवा पूर्ण सुरू राहील
📥 जिम, सलून, स्पा,वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील
📥 बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू राहतील
📥 जिल्हयाच्या बाहेर खाजगी वाहन , बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.
👉टप्पा – 3 अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, या जिल्ह्यांचा समावेश आहे
📥 अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील
📥 मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील
📥 हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.
📥 सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील
📥 खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील
📥 इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील
📥 सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल
📥 सामाजित, सांस्कृती, मनोरंजनात्म कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार)
📥लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील
📥 कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील
📥 दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल
👉टप्पा – 4 पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्याचा समावेश आहे
📥अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील
📥अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील
📥 सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील
📥 हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील
📥 सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)
📥अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील
📥 शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती
📥 स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील
📥 कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही
📥 लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक
📥 राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील
📥 ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील
📥 कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.
📥 ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील
📥सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही
📥 बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही
📥संचारबंदीचे नियम लागू राहतील

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!