👉उद्या सकाळी 11. 00 वा. अहमदनगर अमरधाम येथे अंत्यविधी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – येथील सुरेश रामय्या बोज्जा, कारभारी (वय – 72 वर्षे )यांचे पुणे येथील के ई एम हॉस्पिटल मध्ये अल्पशा आजाराने गुरुवारी (आज) निधन झाले. उद्या दि. 31 मार्च 2023 रोजी सकाळी 11.00 वा. त्यांची राहत्या घरापासून ( सिमलाकॉलोनी, पाईप लाईन रोड, भिस्तबाग, अहमदनगर ) अंत्ययात्रा निघणार आहे. अमरधाम नालेगाव येथे सकाळी 11.30 वाजता अंत्यविधी होणार आहे.
सुरेश रामय्या बोज्जा हे पदमशली समाजातील जेष्ठ नागरिक व पंच म्हणून काम केले असून पद्माशाली पंच कमिटी चे सहसचिव म्हणूनही काम केले आहे. ते कारभारी म्हणून परिचित होते. त्यांच्या मागे चार मुले व एक विवाहित मुलगी , सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांचे ते वडील असून मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा यांचे ते सासरे होते. त्यांचे दुःखदनिधनामुळे पदमशली समाजातील जेष्ठ नागरिकाची व मार्गदर्शकाची मोठी पोकळी निर्माण झाली.