संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
सुपा : दुचाकी व मेडिकलमधील पैसे चोरणारी टोळी पकडण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे. बापु उर्फ संग्राम साहेबराव कव्हाणे, विठ्ठल संजय घोडके अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण (चार्ज), व नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस ठाण्याच्या पोनि श्रीमती ज्योती गडकरी यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ खंडेराव शिंदे, पोना संदीप पवार आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१० एप्रिल २०२३ पारनेर जातेगाव येथील यात्रेमधून संजय बाळासाहेब दळवी यांची स्प्लेंडर दुचाकी (एम एच १६ बीएन ६३९६) ही चोरी झाल्याबाबत सुपा पोलीस ठाण्यात गु.र.नं.१२७/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होता. हा दाखल गुन्हा उघडकीस आणण्याबाबत एसपी राकेश ओला यांनी सुचना दिल्याने सुपा पोलिस ठाण्याच्या पोनि ज्योती गडकरी यांनी गुन्ह्याच्या तपासकामी पथक नेमण्यात आले. गुन्ह्याच्या तपासात असताना गुन्ह्यात चोरी गेलेली काळ्या रंगाची स्प्लेंडर दुचाकी (एम एच १६ बीएन ६३९६) ही घोसपुरी ता. अ. नगर येथे बापु उर्फ संग्राम साहेबराव कव्हाणे व विठ्ठल संजय घोडके यांनी चोरी करुन ती दुचाकी वापरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार सुपा पोलिस टिम तात्काळ घोसपुरी येथे दाखल होऊन गुन्ह्यात चोरीस गेलेली दुचाकी व आरोपी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक विचारपुस केली असता आरोपींनी दि. ७ एप्रिल २०२३ रोजी बेलवंडी (ता. श्रीगोंदा) येथे मेडिकलमधील काऊंटरच्या ड्राव्हरमधून चोरी केल्याची कबुली दिली. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात ११३/२०२३ भा.द.वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये आरोपींकडून स्प्लेंडर NXG नं MH.17.AS. 1290 (चॅसी नं MBLHA12EMB9M06546), होंडा शाईन काळ्या व लाल रंगाची (चॅसी नं ME4JC368A98080409), स्प्लेंडर नं MH 16 BN 6396 तिचा (चॅसी नं. MBLHAIOBWFHG70107), इंजिन नं. ‘HAIOEWFHG12453 4. काळ्या रंगाची स्प्लेंडर (चॅसी नं MBLHA 10EE89H26881) या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.