संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
सीबीएसई बारावी बोर्डाच्या (CBSE Board) परिक्षांमध्ये गेली अनेक दिवस संभ्रम सुरु आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक येत्या १ जून रोजी घोषित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे CBSE बारावी बोर्डाच्या परीक्षांचा कालावधी दीढ तास कमी करण्यात आला आहे. त्यामुळे १२ वीच्या परीक्षांचे पेपर केवळ ३० मिनिटांचे असणार आहेत. रविवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी बारावी बोर्डाच्या परीक्षांचे प्रारुप आणि तारखा १ जून रोजी जाहीर करु असे सांगितले आहे. (CBSE Board: 30 minute paper for 12th exam, schedule will be announced on 1st June)
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा या अर्धा तासांच्या घेण्यात येतील. या परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ (MCQ Type Questions) प्रश्न विचारण्यात येतील,अशी शक्यता आहे. परंतु शिक्षण मंत्रालयाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. केवळ अधिकृत परीक्षेंच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा करा, असे CBSEच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले आहे.