संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्ध येथे पद्मश्री पोपटराव पवार व ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आण्णा हजारे मान्यवरांच्या उपस्थितीत ‘सीएमएस’ छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशन दिनदर्शिका अनावरण नुकतेच करण्यात आले.

पद्मश्री पोपटराव पवार व ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांना ‘सीएमएस’च्या केलेल्या समाजकार्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. सीएमएस’ संघटनेचे समाजकार्यात योगदान देणाऱ्या सीएमएस’च्या ऍडमिन टीमचे श्री पवार व श्री हजारे यांनी कौतुक करीत, संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

यावेळी सीएमएस’चे ऍडमिन टीमचे संदीप नवसुपे, मनोज सोनवणे, संजय शिंदे, अशोक गाडे , भरत सुंबे, संतोष बेरड, मयूर सोनवणे, सुरेंद्र खाकाळ, रोहिनीताई वाघमारे व सीएमएस’संघटनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.