सीएट कंपनी टायर परस्पर विक्री करणाऱा चालक जेरबंद ; अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : तब्बल २ लाख ५२ हजार रु.ची सीएट कंपनीचे टायरची परस्पर विक्री करणाऱ्या चालकाला पकडून मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टिमने ही कामगिरी केली आहे. इरशाद निशार अहमद (वय ५५, रा.रामपूर कुमियान, पो.तलालपट्टी, प्रतापगड, उत्तरप्रदेश), अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा (वय २४, रा.जिन मैदानजवळ, चाळीसगाव रोड, धुळे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच चे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार क्राईम ब्रॅंचचे पोसई तुषार धाकराव, पोअं बापुसाहेब फोलाणे, मनोहर गोसावी, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, सागर ससाणे, महादेव भांड आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी परकोट मारिटिमा एजन्सी (तामीळनाडू) या कंपनीच्या मार्फत कंटेनर (क्र.पीबी-१३ -एडब्लू-५०६४) मधून सीएट कंपनीचे टायर हलोल, गुजरात येथून होसूर तामीळनाडू येथे मागविलेले होते. कंटेनर चालकाने सीएट कंपनीचे टायरची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली व रिकामा कंटेनर जातेगाव शिवार, (ता.पारनेर) येथे उभे केले, मोहमंद मुस्ताफा (रा.मेन रोड, श्रीवाचुर, पेरंबलोर, तामिळनाडू) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुपा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०६/२०२५ बीएनएस कलम ३१६(४) प्रमाणे विश्वासघाताचा गुन्हा दाखल आहे.
या दाखल गुन्ह्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार क्राईम ब्रॅंचचे पोनि दिनेश आहेर यांनी नियुक्त तपासी टीमने गुन्ह्याच्या तपासाचे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे संशयीत आरोपी इरशाद निशार अहमद हा धुळे शहरामध्ये असल्याचे निष्पन्न केले. दि.१९ जानेवारी २०२५ पथकाने धुळे शहरामध्ये संशयीत आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव इरशाद निशार अहमद (रा.रामपूर कुमियान, पो.तलालपट्टी, प्रतापगड, उत्तरप्रदेश) असे असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीकडे गुन्ह्याबद्दल विचारपूस केली असता त्याने ट्रकमधून सीएट कंपनीचे टायर तामीळनाडू येथे घेऊन जात असताना त्याचा साथीदार फरारी जावेद उर्फ जोसेफ शेख (रा.राणीगंज, जि.प्रतापगड, उत्तरप्रदेश) व जावेदचा मित्र अन्सार (पूर्ण नाव माहित नाही) अशांनी अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा (रा.जिन मैदानजवळ, चाळीसगाव रोड, धुळे) यास ८२ टायर्स विकले. तसेच ट्रकमधील उर्वरित टायर्स हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विक्री केले. त्याबाबत मला सांगता येणार नसल्याबाबतची माहिती सांगितली. क्राईम ब्रॅंच टीमने अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा (वय २४ रा.जिन मैदानजवळ, चाळीसगाव रोड, धुळे) याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्यातील मुद्देमालबाबत विचारपूस केली असता रोडने जाणाऱ्या ट्रकला वेळोवेळी टायर विकले व उर्वरित टायर्स हे अनिस हयात खान (रा.रमाबाई आंबेडकरनगर, गल्ली नं.9, देवपूर, धुळे) याच्या दुकानाच्या मोकळ्या जागेत ठेवल्याबाबत माहिती दिली.
क्राईम ब्रॅंच टीमने पंचासमक्ष अनिस हयात खान (वय ३९, रा.रमाबाई आंबेडकरनगर, गल्ली नं.9, देवपूर, धुळे) याने त्याचे दुकानासमोर ठेवलेले २ लाख ५२ हजार रुपये किंमतीचे सीएट कंपनीचे १२ टायर हजर केल्याने तपासकामी जप्त करण्यात आले आहेत. ताब्यातील आरोपी इरशाद निशार अहमद (वय ५५, रा.रामपूर कुमियान, पो.तलालपट्टी, प्रतापगड, उत्तरप्रदेश) व अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा (वय २४, रा.जिन मैदानजवळ, चाळीसगाव रोड, धुळे) यांना ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह सुपा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. गुन्ह्यांचा पुढील तपास सुपा पोलीस हे करीत आहेत.