👉लवकरच या भागातील प्रमुख रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण होणार ५ कोटी या रस्त्याच्या कामासाठी मंजूर महापौर रोहिणीताई शेंडगे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :- प्रभाग क्रमांक ४ मध्ये नगरसेवक योगीराज गाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून सिव्हील हडको येथील क्रांती चौकातील वैष्णव माता मंदिर परिसरात संरक्षण भिंत टाकण्याच्या कामाचा शुभारंभ महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.
यावेळी प्रभागातील नागरिकांना येणाऱ्या समस्या नगरसेवक योगीराज गाडे यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिल्या. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या भागात मोठा असून लवकरच नागरिकांसोबत महानगरपालिकेत एक बैठक लावून हा प्रश्न सोडवला जाईल अशी ग्वाही महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी नागरिकांना दिली, तसेच या भागातील महत्त्वाचा असणाऱ्या सिमेंट काँक्रेट रस्त्यासाठी ५ कोटी मंजूर केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लवकरच या कामालाही सुरुवात होईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले .
नगरसेवक योगीराज गाडे यांनी महापौर रोहिणी शेंडगे यांचे प्रभागात स्वागत केले तसेच प्रभागातील महिलांनी महापौर यांचा शाल बुके देऊन सत्कार केला .
महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत लवकरच ही कामे मार्गी लागतील अशी आशा व्यक्त केली .
या शुभारंभ प्रसंगी अनिल दळवी, प्रमोद बोरा, नंदकुमार भावसर, दत्तात्रय कुलथे, सुरेश दरेकर, अश्विनी दळवी, वैशाली त्रिंबके, माधुरी धनेश्वर, अमित भलगट, उद्धव त्रंबके ,ऋषिकेश सांगळे, आदींसह प्रभागातील महिलावर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.