सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह लेख लिहिणार्‍या लेखक व वेबसाईटवर कारवाई करावी : समता परिषदेचे निवेदन

संबंधितांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार – अंबादास गारुडकर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
 – Ahemnagar news क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणार्‍या ‘इंडिक टेल्स’ व ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करुन निवेदन निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी समता परिषदेचे उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, महानगर अध्यक्षा स्वाती सुडके, अशोक गोरे, तालुकाध्यक्ष रामदास फुले, जालिंदर बोरुडे,  प्रा.माणिकराव विधाते, दिपक खेडकर, भरत गारुडकर, किरण नगरे, गुलाब गायकवाड, संदिप ठुबे, बबनराव घुमटकर आदिंसह समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
     जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘इंडिक टेल्स’ आणि हिंदू पोस्ट नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक अद्यसमाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी  अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात अलेले आहे. शरयु ट्रस्ट नावाची संस्था ‘इंडिक टेल्स’ ही वेबसाईट चालविते. ‘सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय’ अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आलेला आहे हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि निंदनिय असून, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
     क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांना शिक्षण  मिळावं, म्हणून संपूर्ण आयुष्य वेचले. शिक्षण देत असतांना तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड,धोंडे, शेणाचे प्रहार झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात आहे.  21 व्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करत आहे. या पोर्टवर इतिहासाची पुर्नमांडणी या नावाखाली अक्षरश: इतिहासाची मोडतोड सुरु आहे. ही समाज विघातक प्रवृत्ती वेळीच ठेचण्याची आवशकता आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
     याप्रसंगी अंबादास गारुडकर म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची बदनामीबाबतचा विषय शासनाने गांभिर्याने घेऊन आक्षेपार्ह लेख लिहिणार्‍या ‘इंडिक टेल्स’ व ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारे लेखक आणि वेबसाईटवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावरुन उतरुन मोठे तीव्र स्वरुपाचे आंदोलन पुढील काळात छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
     यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक यांनाही समता परिषदेच्यावतीने निवेदन देऊन संबंधित लेखकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!