संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये नोंदणी झालेले न्यास हे त्यांचे नामफलक हे मराठी भाषेमध्ये लावत नाहीत. ते मराठी भाषेमध्ये लावणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व नोंदणीकृत न्यासांचे पदाधिकारी यांनी त्यांच्या न्यासाचा नामफलक मराठी भाषेमध्ये दर्शनी भागामध्ये लावावा आणि यासंदर्भात रा्ज्य शासनाचा मराठी भाषा विभाग आणि धर्मादाय आयुक्त, मुंबई यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाही करुन आदेशाचे पालन करावे, असे आवाहन धर्मादाय उपायुक्त हि. का.शेळके यांनी केले आहे.