सामाजिक, धार्मिक परंपरा जपणारे एकमेव मंडळ माळीवाडा तरुण मंडळ ः आ. संग्राम जगताप
माळीवाडा तरुण मंडळाच्या अघोरी शिवशक्ती देखाव्याचे उद्घाटन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर ः गणेशोत्सवात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. सार्वजनिक मंडळाच्यावतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करुन देखावे सादर होत आहेत. या देखाव्यांच्या माध्यमातून आपली परंपरा, संस्कृती टिकाविण्याचे काम होत आहे. माळीवाडा तरुण मंडळाने नेहमीच वेगवेगळ्या देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक परंपरा जपली आहे. यंदा सादर केलेला देखावा अघोरी शिवशक्ती हा धार्मिक देखावा आहे, माळीवाडा तरुण मंडळ हे मानाचे मंडळ असून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
माळीवाडा तरुण मंडळाच्या अघोरी शिवशक्ती या देखाव्याचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्याहस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष निलेश खरपुडे, उपाध्यक्ष मयुर भापकर, गणपत चेडे, खजिनदार अशिष खंदारे, अविनाश घुले, प्रा.माणिकराव विधाते, बजरंग भुतारे, विष्णुपंत म्हस्के, रोहित साठे, अक्षय नलगे, सागर विधाते, शुभम भापकर, जय सानप, शुभम आंबेकर, धनंजय पालवे, गणेश कोल्हे, बाबा घोडके, सुनिल झिर्पे, सोनु भुतारे, विनायक वडे आदींसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष निलेश खरपुडे म्हणाले की, माळीवाडा मंडळ हे जुने असून नेहमीच गणेशोत्सात ऐतिहासिक, धार्मिक देखावे सादर करुन आपला इतिहास व संस्कृती दृढ करण्याचा प्रयत्न करत असतो. यंदाच्या वर्षीही अघोरी शिवशक्ती’ देखावा सादर केला आहे. माळीवाडा मंडळ हे मानाचे असून दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाचे सर्व पदाधिकारी हे गणेश उत्सवानिमित्त सहभागी होवुन हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि सामाजिक संदेश जाईल अशा पद्धतने साजरा करत असतात. त्यामुळे माळीवाडा तरुण मंडळाचा नगर जिल्ह्यात नावलौकीक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. मंडळाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयुर भापकर, आभार गणपत चेडे यांनी मानले. मंडळाने यंदा अघोरी शिवशक्ती हा देखावा सादर केला असून त्यामध्ये 11 हलत्या मुर्ती असून अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली आहे.