संग्राम सत्तेचा वापर
Online Natwork
अहमदनगर – साथी विठ्ठल बुलबुले यांचे नुकतेच निधन झाले त्यांचे जाण्याने पदमशाली समाजामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली असून विठ्ठल याचे कार्य नुसते अहमदनगर शहरापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व राज्याबाहेरही त्याचे कार्य चालू होते. अशा कमी वयात थोर अशी कीर्ती गाजवणाऱ्या कार्यकर्त्यांचे कायमस्वरूपी स्मारक सावेडी उपनगरात किंबहुना प्रोफेसर चौकाच्या परिसरात उभे करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे.

विठ्ठल हा राष्ट्र सेवा दलाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षे काम केले असून यशदा च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व्यख्यान देण्यासाठी जात असे. तसेच माहितीच्या अधिकार बाबत जनजागृती चे काम मोठया प्रमाणात केले आहे. तसेच भाषण कसे करावे या बाबतचे मार्गदर्शन लहान मुलापासून ते मोठे अधिकारी व नेत्यांनाही करीत असे.
विठ्ठल चे कार्य हे अनगणीत होते, प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये स्वतःहुन हिरारीने भाग घेत असे मग त्या वेळी कधीही स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही. प्रत्येक वेळेस समाजपरिवर्तन घडवीन्या बाबत काय करता येईल या बाबतचा विचार करीत असे.
विठ्ठल चे पदमशाली समाजामध्ये ही भरीव कार्य होते. अनेक समाजातील तरुण घडवून त्यांना मार्गदर्शन देण्याचे कार्य करीत असे. समाजामध्ये चुकीच्या प्रवृत्तीना कडाडून व रोख ठोक पणे विरोध करीत असे.
अशा सामाजिक कार्यात अहमदनगर शहरांतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अचानक जाण्या मुळे समाजाची मोठी हानी झाली असून त्याचे कायमस्वरूपी आठवण राहण्यासाठी साथी विठ्ठल बुलबुले याचे कायमस्वरूपी स्मारक सावेडी उपनगर अगर प्रोफेसर चौक परिसरात उभारावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. जिल्हाधिकारी व मा. आयुक्त यांच्याकडे केली असून विठ्ठल याचे स्मारक उभारणी साठी लवकरच एक बैठक घेणार असल्याची माहिती श्रीनिवास बोज्जा यांनी दिली.