साडेतीन लाखांचा सोने जप्त, ४ चोरटे जेरबंद ; ‘नगर एलसीबी’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पारनेर : परिसरातील शेतवस्तीवर चोरी करणाऱ्या चौघा सराईत चोरट्यांना पोलिसांनी पकडले. या कारवाईत ३ लाख ५७ हजार ५०० रुपये किंमतीचे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी नगर एलसीबीने केली आहे. आरोपी मिथून उंब-या काळे (वय २३), अक्षय उंब-या काळे (वय २६), संजय ऊर्फ संज्या हातण्या भोसले (वय ५५, सर्व रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा), गंगाधर संदल चव्हाण (वय २१, रा. दिवटेवस्ती, वाघुंडे, ता. पारनेर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे सपोनि हेमंत थोरात, अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर व अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.