साकुर कान्हा ज्वेलर्स दरोड्यातील ५ आरोपी अटक ; ‘नगर एलसीबी’ची कामगिरी

साकुर कान्हा ज्वेलर्स दरोड्यातील ५ आरोपी अटक ; ‘नगर एलसीबी’ची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : साकुर येथील कान्हा ज्वेलर्स मध्ये सशस्त्र टाकण्यात आलेल्या दरोड्यातील पाच जण पकडून, त्याच्याकडून २० तोळे सोने हस्तगत करण्याची कारवाई अहिल्यानगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, संगमनेर डावायएसपी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोसई तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संतोष लोढे, फुरकान शेख, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, अमोल कोतकर, जालींदर माने, अमृत आढाव, संतोष खैरे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, महादेव भांड, अर्जुन बडे व भाग्यश्री भिटे आदींच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी १.३० वाजण्याच्या सुमारास साकुर येथील कान्हा ज्वेलर्स दुकानामध्ये ग्राहकासोबत बोलत असताना अज्ञात पाचजणांनी दुकानामध्ये प्रवेश केला. त्यापैकी तिघांकडे गावठी कट्टे असून त्यांनी गावठी कट्टयाचा धाक दाखवून कान्हा ज्वेलर्समधून ५२ लाख ४१ हजार ६०० रूपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरी करून घेऊन गेले, या संकेत सुभाष लाळगे (वय २४, रा.साकुर, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुरनं ४०२/२०२४ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३१०(२) शस्त्र अधिनियम ३/२५ प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अग्नीशस्त्रासह ज्वेलर्स दुकानावर घडलेल्या दरोडयाची गुन्हयाची प्राथमिक माहिती मिळताच एसपी राकेश ओला,
श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व अहिल्यानगर एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी तात्काळ घटनाठिकाणी देऊन, आरोपीचा शोध घेणेबाबत आदेशीत केले होते. पोलीस टीमने गुन्ह्यातील आरोपींचा पाठलाग करून शिक्री (ता.संगमनेर) येथील डोंगर परिसरातमधून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.
आदेशान्वये एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी एलसीबी व तपास टीम नेमूण गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत आवश्यक सूचना देऊन टीम रवाना केली. तपास टीमने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यामध्ये मनोज साठे (रा.माळशिरस, जि.सोलापूर) यास निष्पन्न करुन त्याचा व गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमालाबाबत तपास करत होते.तपास टीमला दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी माहिती मिळाली की, आरोपी मनोज साठे याने गुन्ह्यातील चोरी केलेले सोने त्याचा साथीदार धोंडया जाधव, (रा.निघोज, ता.पारनेर) व सुनिल उर्फ निल चव्हाण (रा.गणेशपेठ पुणे) यांचेकडे विक्रीकरीता दिलेले आहे. या मिळालेल्या माहितीवरून तपास पथकाने पुणे येथून जाऊन संशयीताचा शोध घेतला असता सुनिल उर्फ निल विजय चव्हाण (वय २८, रा.गणेश पेठ, पुणे) हा मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने गुन्हयातील सोन्याचे दागीने अभिषेक महेश तळेगावकर ( रा.रविवार पेठ, पुणे) याच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार तपासी टीमने अभिषेक महेश तळेगावकर याचा शोध घेऊन, तपास करून त्याने सोने सोमवार पेठ (पुणे) येथील सोनाराकडे विकाल्याची माहिती दिली. तपास टीमने पंचासमक्ष सोमवार पेठ (पुणे) येथील सोनाराकडून १५ लाख ३ हजार ४२५ रूपये किंमतीचा ( १९५.२५० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड ) मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्ह्याचा तपासात निष्पन्न आरोपी मनोज साठे हा बेलवंडी फाटा येथे असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून तपासी टीमने
बेलवंडी फाटा (ता.श्रीगोंदा) येथे सापळा रचून संशयीताचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांना पोलीसांची ओळख सांगून त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव दयावान उर्फ मनोज बाळासाहेब साठे (वय २५, रा.गोरडवाडी, ता.माळशिरस, जि.सोलापूर), अजय उर्फ भोऱ्या उर्फ भोल्या बाळु देवकर (वय २२, रा.कौठेयमाई, ता.शिरूर, जि.पुणे), योगेश अंकुश कडाळे (वय २७, रा.धामणी, लोणी, ता.आंबेगाव, जि.पुणे) व आकाश ठकाराम दंडवते (वय २८, रा.मलठण, ता.शिरूर, जि.पुणे) असे सांगितले. ताब्यातील आरोपीकडून ९२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात अजय उर्फ भोल्या बाळु देवकर याचे ताब्यातून ३० हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्तूल व २ हजार रू किं. दोन जिवंत काडतुस व आरोपीकडून प्रत्येकी एक मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपुस करता, त्यांनी गुन्हा पळून गेलेला धोंडया महादु जाधव व मन्ना उर्फ सुरजसिंग उर्फ अजयसिंग (रा.पंजाब) अशांनी केला असल्याची माहिती दिली.
तपास टीमने ताब्यात आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पळून गेलेला आरोपी धोंडया महादु जाधव याने सर्व आरोपींना एकत्रित करून गुन्ह्यांचा प्लॉन तयार केलेला आहे. त्यासाठी आरोपी हे दिवाळी सणाच्या वेळी स्विप्ट गाडीमध्ये साकुर,व (ता.संगमनेर) येथे येऊन कान्हा ज्वेलर्स पाहणी केली. गुन्हा करण्यासाठी धोंडया महादू जाधव याने आरोपीच्या मदतीने दोन गावठी कट्टे व काडतुस, गुन्हयात वापरलेल्या दोन पल्सर दुचाकी या बारामती येथून चोरून आणल्या आहेत. दि.१० नोव्हेंबर २०२४ रोजी अक्षय बाळु देवकर, मन्ना व अक्षय वावरे हे दुचाकीवर साकुर येथे येऊन गुन्हा केल्यानंतर पळून जाण्याकरीता परिसरातील रोडची पाहणी केली.
आरोपी धोंडया महादु जाधव हा प्रत्यक्ष घटना ठिकाणी न येता त्याने दि.११ ऑक्टोबर २०२४ रोजी आरोपी अजय देवकर, अक्षय वावरे, मन्ना, स्वप्नील येळे व मनोज साठे यांना दोन पल्सर दुचाकीवर साकुर येथे गुन्हा करण्यासाठी पाठविले व तो बाहेरून आरोपीकडून व्हॉटसअप कॉलद्वारे माहिती घेत होता. आरोपी हे पल्सर मोटार सायकलवर दिनांक 11/10/2024 रोजी दुपारी 01.30 वा.सुमारास कान्हा ज्वेलर्स, साकुर येथे येऊन मन्ना याने दुकानादारास पिस्टलचा धाक दाखविला. स्वप्नील येळे हा पिस्टलसह दुकानाचे बाहेर होता.अक्षय देवकर व मनोज साठे याने दुकानातील सोन्याचे दागीने पिशवीत भरले. दुकानातून जातेवेळी मन्ना व स्वप्निल येळे यांनी गावठी कट्टयामधून प्रत्येकी एक राऊंड फायर केला.
गुन्हा केल्यानंतर आरोपी पळून जात असताना टाकळी ढोकेश्वर येथे रस्ता चुकले. त्यावेळी पोलीस व लोक आरोपीचा पाठलाग करत असताना आरोपी हे पल्सर दुचाकी सोडून शिक्री येथील डोंगरामध्ये पळून गेले. आरोपीपैकी अक्षय बाळु देवकर, मनोज बाळासाहेब साठे व मन्ना उर्फ सुरजसिंग असे रात्रभर डोंगरामध्ये लपून सकाळच्या वेळी आळेफाटा ते नगर जाणारे हायवेला येऊन त्यांनी धोंडया महादु जाधव यास मोबाईल करून हायवेला बोलावून घेतले. धोंडया जाधव हा स्वीफ्ट गाडीने येऊन आरोपींना मंचर येथे घेऊन गेला. त्यावेळी गुन्ह्यातील सोन्याची दागिने असलेली बॅग मनोज बाळासाहेब साठे याच्याकडे होती. मंचर येथे पोहचल्यानंतर धोंडया महादु जाधव याने बॅगमधील काही सोन्याचे दागिने मनोज बाळासाहेब साठे यास दिले. गुन्ह्यात वापरलेले पिस्टल व बॅगमधील काही सोन्याचे दागीने धोंडया महादु जाधव व उर्वरित सोन्याचे दागिने हे मन्ना उर्फ अजयसिंग उर्फ सुरजसिंग (रा.पंजाब) हा घेऊन गेला असल्याची माहिती सांगितली आहे. ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी घारगाव पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले. पुढील तपास घारगाव पोलीस हे करीत आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!