संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – नव्याने हजर झाल्यानंतर सपोनि शिशिरकुमार देशमुख यांनी पहिलीच नगर तालुक्यात धडाकेबाज कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. साकत गावच्या शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी अड्यांवर नगर तालुका पोलिसांनी छापे टाकून उध्वस्त करण्याची मोठी कारवाई केली आहे.
एसपी राकेश ओला, नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार ‘नगर तालुका पोलिस टिम’ने ही कारवाई केली आहे.
कारवाई दरम्यान ३ गावठी हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करण्यात आले. कारवाईत ८४ हजार रुपये किमतीचे १ हजार २०० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन व ८ हजार रुपये किमतीची ८० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जागीच नष्ट करण्यात आली, असा एकूण ९२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्याची मोठी कामगिरी नगर तालुका पोलिसांनी केली आहे.