संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर ः तालुक्यातील साकत येथील सोयाबीन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मुद्देमालासह पकडण्यात एलसीबी टीमला यश आले आहे. अनानाथ गजानन काळे (वय22), देवकर गजानन काळे (वय 20, दोन्ही रा.दहिगाव, ता.अहिल्यानगर) ही पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार टीमचे पोउपनि अनंत सालगुडे, पोकॉ लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, राहुल सोळुंके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, जालींदर माने, अरूण मोरे तसेच बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, विजय ठोंबरे, मेघराज कोल्हे आदींच्या टीमने ही कारवाई केली.
दि.10 ऑक्टोबर 2024 रोजी शेतातील जनावरांच्या गोठयातून अज्ञात चोरटयांनी 23 सोयाबीनच्या गोण्या संमतीशिवाय स्वत:च्या आर्थिक फायदयाकरीता चोरून नेल्या आहे, या सतीश भानुदास कार्ले ( रा.साकत, ता.अहिन्यानगर) यांच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुरनं. 770/2024 बीएनएस कलम303(2)प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या आदेशानुसार एलसीबी टीमने घटनाठिकाणी भेट देऊन, गुन्हयातील चोरीस गेला माल, आरोपीची माहिती घेत असताना दि.17 ऑक्टोबर 2024 रोजी पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे यांना माहिती मिळाली. त्या आधारे पोलीसांनी दहीगाव व वाळकी रोडने जाऊन, दोन संशयीतांस ताब्यात घेतले. त्यांना त्यांची नाव गांव विचारले असता त्यांनी नाव अनानाथ गजानन काळे (वय 22) , देवकर गजानन काळे (वय 20, दोघे रा.दहिगाव, ता.अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी गुन्हा त्यांचे साथीदार फरारी अजय गजानन काळे, देवानंत धर्मेद्र चव्हाण, नदिम धर्मेद्र चव्हाण, साईनाथ गजानन काळे, चिरंजीव भोसले व लड्डया चव्हण (सर्व रा.दहिगाव, ता.अहिल्यानगर) अशांनी मिळून कार्लेवस्ती (साकत) येथील शेतवस्तीवरून 23 सोयाबीनच्या गोण्या चोरून आणल्या होत्या. चोरून आणलेल्या गोण्यापैकी 9 सोयाबीनच्या गोण्या श्रीराम ट्रेडींग कंपनी, रूईछत्तीसी (ता.अहिल्यानगर) व 10 सोयाबीनच्या गोण्या सिध्दीविनायक ट्रेडींग कंपनी (वाळकी, ता.अहिल्यानगर) यांना विकल्याची माहिती सांगीतली.
तपास पथकाने पंचासमक्ष श्रीराम ट्रेडींग कंपनी येथून 19 हजार 350 रु.चे 9 सोयाबीनच्या गोण्या व सिध्दीविनायक ट्रेडींग कंपनी येथून 26 हजार 875 रू. किं.च्या 10 सोयाबीनच्या गोण्या असा एकूण 46 हजार 225 रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले. पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस हे करीत आहे.