साईनाथ शुगर प्रा. लि. कंपनीने थकविले कर्मचाऱ्यांचे वेतन ; क्रांतीसेनेचे श्रीगोंदा तहसीलदार यांना निवेदन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

श्रीगोंदा – तालुक्यातील उक्कडगाव येथील साईनाथ शुगर प्रा.लि. कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन थकविल्याची तक्रार जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर व शेतकरी तालुकाध्यक्ष वैभव जाधव यांच्याकडे केली होती.या तक्रारीची दखल घेत जिल्हाध्यक्ष दरेकर व तालुकाध्यक्ष जाधव यांनी नायब तहसीलदार चारुशिला पवार यांना दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांचे थकित पगार लवकरात लवकर मिळावेत,अशी मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, या कंपनीतील कामगारांना नोव्हेंबर महिन्यापासून पगार देण्यात आले नाहीत.याकारणास्तव कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे.कोरोना काळात कर्मचाऱ्यांना पगार न देता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.याबाबत कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीच्या कर्मचार्यांनी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा करत सहकार्य करावे अशी विनंती करत आज तहसील कार्यालयात एकत्रित येत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.तसेच लवकरात लवकर पगार न झाल्यास कंपनीच्या चेअरमन यांच्या निवासस्थानी डफले बजाव आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी सुभाष दरेकर,वैभव जाधव,अनिकेत सोनवणे,संजय पवार, साहेबराव लबडे,भरत मडके, अविनाश लगड,शरद मांडे,दिपक ढवळे, शिवाजी देशमुख,अनिल ढवळे,अक्षय भोंडवे,शिवाजी अडागळे,आशिष शेलार,संतोष भोस,सनी अडागळे,संजय शिनवरे,समीर सय्यद,भिवसेन मदने,अक्षय बडवे,जालिंदर कुदांडे,सयिस शेख,दत्तात्रय निंबाळकर,रमेश चौधरी,सुदाम सांगळे, उनवणे,रोहिदास लगड, दिलीप शेलार,गुलाबराव लोंढे, योगेश गोरणे,पवन आवताडे, अशोक रहाणे,दिपक साळवे, त्रिंबक साळवे,संजय लांडे,तुळसीराम अडागळे,संदीप ढवळे,प्रविण म्हस्के आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!