संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पुणे : खेड तालुक्यातील कन्या विद्यालय चाकण येथील सहशिक्षिका श्रीमती आशा रामनाथ तांदळे-ढाकणे यांची शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक पतसंस्था चाकणच्या स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पिंगळे मॅडम व सर्व शिक्षिका वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यालयामध्ये सन्मान करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील त्या मूळ रहिवासी आहेत. स्वीकृत संचालक सौ. आशा रामनाथ तांदळे-ढाकणे मॅडम या हातगावचे प्रभारी मुख्याध्यापक,प्राचार्य तथा वंजारी विकास ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख दादासाहेब ढाकणे सर यांच्या त्या धर्मपत्नी आहेत.
सौ. आशा रामनाथ तांदळे-ढाकणे मॅडम यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड २०१९ हा पुरस्कार मिळून निर्माण केला होता. आत्ता सहकार व सामाजिक क्षेत्रात त्यांच्या कार्याचा विचार करून विद्यालयाने त्यांची शिवछत्रपती खेड तालुका शिक्षक सेवक पतसंस्थेच्या स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड केल्यामुळे हातगावचे नाव महाराष्ट्राच्या औद्योगिक नगरी चाकणमध्ये निर्माण केले आहे. यामुळे सर्व मित्र परिवार, नातलग व समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.