संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या सुगंधी तंबाखू विक्रेत्याविरुध्द कारवाई करुन ६ लाख २५ हजार रु. किंचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, कर्जत डिवायएसपी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोहेकॉ दिनेश मोरे, संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, राहुल सोळुंके, संदीप चव्हाण,पोना लक्ष्मण खोकले पोकाॅ मच्छिद्र बर्डे, कमलेश पाथरुट व रणजित जाधव आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली.
एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि अनिल कटके यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. आदेशान्वये पोनि श्री. कटके यांनी एलसीबी टिम’ला बोलावून फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
एलसीबी टिम’ने नगर शहर व तालुका परिसरात फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना पोनि श्री. कटके यांना माहिती मिळाली की, दोनजण वडगांव गुप्ता ते पिंपळगाव माळवी रोड, बायपास चौकात जितो मालवाहू टेम्पोत सुंगधी तंबाखू चोरुन विक्री करण्यासाठी येणार आहेत, आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि श्री कटके यांनी एलसीबी टिम’ला माहिती कळवून पंचांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. एलसीबी टिम’ने पंचांना सोबत घेऊन वडगांव गुप्ता ते पिंपळगाव माळवी रोडने जाऊन बायपास चौकात सापळा लावून थांबलेले असतांना जितो टेम्पो येताना दिसला टिमची खात्री होताच, टेम्पो चालकास हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. त्याने ताब्यातील जितो टेम्पो रस्त्याचे कडेला उभा केला. त्यावेळी टेम्पोमध्ये दोनजण बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सौरभ मुकूंद धामनगांवकर (वय ३०), सलमान अहमद शेख (वय ३०, दोन्ही रा. गोविंदपुरा, अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्यांना टेम्पोमध्ये काय आहे, अशी विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीस समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यांना अधिक विश्वासात घेऊ बारकाईने विचारपुस करता त्यांनी टेम्पोमध्ये सुगंधी तंबाखू असल्याबाबत माहिती दिली.
त्याच्या ताब्यातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला विविध प्रकारचा २ लाख २५ हजार कि.ची सुगंधी तंबाखु पांढ-या रंगाच्या १५ गोण्या तसेच ४ लाख रुपये किंमतीचा महिंद्र कंपनीचा जितो मॉडेलचा टेम्पो असा एकुण ६ लाख २५ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना सुगंधी तंबाखु मालकाबाबत विचारणा करता त्यांनी झाहिद ऊर्फ जावेद खान (रा. गोविंदपुरा, अहमदनगर) यांच्या मालकीची असून विक्री करणे करीता घेऊन जात असल्याबाबत सांगितल्याने झाहिद ऊर्फ जावेद कदीर खान (वय ३१ रा. गोविंदपुरा मुकुंदनगर अहमदनगर) याचा शोध घेतला असता, तो मिळून आला. तिघांना ताब्यात घेऊन एलसीबीचे पोकॉ कमलेश हरिदास पाथरूट यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गु.र.नं. १४६ / २०२३ भाविक १८८, २७२, २७३, ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई एमआयडीसी पोलीस करीत आहे.