जामखेड पोलिस ठाण्यात सरपंच, उपसरपंचांची बैठक

रोहित राजगुरू
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
जामखेड : जामखेड पोलीस ठाण्यात सरपंच, उपसरपंच यांची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत बोलताना पोनि महेश पाटील यांनी सरपंचांना सूचना दिल्या. ग्रामीण भागात शेत रस्त्यावर, शेत बांधावर भांडण होत असतात. किंवा काही समाजकंटक गुन्हेगारी करतात गाव गुंड करतात अश्या व्यक्ती ची माहिती सरपंचांनी व उपसरपंचानी पोलीसांना द्यावी.
तसेच लव जहाद, गोवंश हत्या, यात्रा उत्सव,गावामध्ये भांडणे होऊ नये, म्हणून लक्ष देण्याचे काम सरपंचांनी व काही गावातील जबाबदार व्यक्तींनी ठेवावी. सोशल मिडिया वर सरपंचांनी लक्ष दयावे ग्रामसुरक्षा योजना अंतर्गत सर्वाना फोन जोडावे. गुन्हेगारी ना मदत करायची नाही. सरपंच व उपसरपंच यांनी कायदे चे पालन करावे. गावा मध्ये जर अवैध धंदे होत असेल तर तुम्ही पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी.
तसेच चुका हे सर्वांकडून होत असतात पण चुका सुधारून घ्यावे, असे म्हणून पोनि महेश पाटील यांनी आवाहन केले की, सरपंचांनी व उपसरपंचांनी सुध्दा खोट्या तक्रारी दाखल करू नयेत. जे सत्य आहे, तेच सांगायचे आहे.
यावेळी उपस्थित सरपंच व उपसरपंच संतोष महादेव खैरे, हर्षद हिंदुराज मुळे, औदुंबर नाना शिंन्दे, विश्वनाथ शंकर राऊत, सिताराम भिवा कांबळे, श्री युवराज गायकवाड, दिपक नेटके, नवनाथ श्रीधर जाधव, बाबासाहेब शंकर शिंदे, पांडुरंग दत्तात्रय गर्जे, कृष्णा खाडे, वामन आत्माराम डोंगरे, लहू अरुण शिंदे, अशोक गव्हाणे, वाहेद पठाणसह मोठ्या संख्येने सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.

