सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी ; अखिल भारतीय सरपंच महासंघाची मागणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : बीड जिल्ह्यातील मसाजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या घटनेचा तीव्र निषेध करुन आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच महासंघ परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय शेटे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, राष्ट्रीय प्रभारी विनोद वाढणे आदींसह राहाता तालुक्यातील विद्यमान व आजी-माजी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.
राहाता तालुक्यातील सावळीविहीरसह अन्य ग्रामपंचायत परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या दरम्यान
सरपंच महासंघ परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय शेटे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जपे,
पुणतांबाचे सरपंच डॉ.धनंजय धनवटे, सावळीविहीरचे सरपंच ओमेश जपे आदींसह अन्य मान्यवरांनी आपल्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया देत संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.