संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव – पाथर्डी : तालुक्यातील वैजुबाभुळगावच्या महिला सरपंच सौ. ज्योती संतोष घोरपडे यांना व त्यांच्या कुटुंबियांवर गावातील गाव-गुंडांनी घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी संतप्त महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.२५) अर्धातास करंजी येथे रस्तारोको आंदोलन केले.
पाथर्डी तालुक्यातील वैजुबाभुळगाव येथील महिला सरपंच सौ. ज्योती संतोष घोरपडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील त्यांचे पती, सासरे, दिर तसेच कुटुंबातील लहान मुलावर गावातील सेवा संस्थेचे चेअरमन बाळासाहेब घोरपडे यांच्यासह इतर सात लोकांनी घरात घुसुन प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गावातील संतप्त महिला व पुरुषांनी नगर-पाथर्डी महामार्गावर सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले. वैजुबाभुळगाव येथील सरपंच सौ. ज्योती घोरपडे यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनला यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
सरपंच सौ. ज्योती घोरपडे यांनी आपल्या फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राजकीय वैमनस्यातून बाळासाहेब बाबासाहेब घोरपडे, ज्ञानेश्वर बाबासाहेब घोरपडे, सुनिल बाबासाहेब घोरपडे, नितीन शिवनारायण घोरपडे, किशोर उत्तम घोरपडे, अंबादास उत्तम घोरपडे, गणेश विठ्ठल घोरपडे, उत्तम नामदेव घोरपडे (रा. वैजुबाभुळगाव ता. पाथर्डी) यांनी आमच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला करुन माझ्यासह माझ्या पतीला व माझ्या लहान मुलांना देखील जबर मारहाण केली आहे. ही मारहाण ग्रामपंचायतच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी माझ्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण गावात दहशत निर्माण केली असे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
नगर-पाथर्डी महामार्गावर करंजी येथे झालेल्या रस्तारोको आंदोलनात मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे, रावसाहेब लोहकरे, सुधाकर गुंजाळ, बबनराव गुंजाळ, बापु भवार, दिगंबर गुंजाळ, विठ्ठल दारकुंडे, मनेश घोरपडे, अप्पा वांढेकर, नामदेव नरवडे, प्रतिक घोरपडे, राजेंद्र गुंजाळ, सिंधु घोरपडे, मनिषा घोरपडे, छाया गुंजाळ, निर्मला गुंजाळ, अमोल फुलशेटे, नम्रता गुंजाळ, मिरा भवार, अशोक गुंजाळ, बापु घोरपडे, नामदेव मुटकुळेसह अनेक ग्रामस्थ, महिला व परिसरातील नागरिक हजर होते.
ज्या गावगुंडांनी महिला सरपंच व त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला त्या गुंडावर अनेक कलमे लावली असुन लवकरच त्यांना गजाआड करु असे, पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोनि संतोष मुटकुळे यांनी सांगितले.
संकलन : बाळासाहेब खेडकर, शेवगाव.