संभाजी ब्रिगेड सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी : अॅड.मनोज आखरे
मस्साजोगचे सरपंच देशमुख कुटुंबियांची सांतवनपर भेट
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खून करण्यात आला. या खूनाचा मास्टरमाईड समाजासमोर येणे गरजचे आहे. तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेड त्यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड.मनोज आखरे यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखेर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत संभाजी ब्रिगेडचे अहील्यानगर जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत , विभागीय अध्यक्ष राहुल वायकर, प्रदेश संघटक शशिकांत कन्हेरे, बीड शहरजिल्हा अध्यक्ष विजय दराडे , बीड जिल्हा अध्यक्ष प्रविण ठोंबरे व पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना आखरे म्हणाले की, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी स्वतःला चळवळीत आणि लोकसेवेत वाहून घेतले होते. समाजिक सलोखा व बहुजन समाजाच्या हितासाठी त्यांनी मस्साजोग गाव विभागिय स्तरावर गाजविले आहे. संतोष देशमुख यांच्या सेवाभावीवृत्तीमुळे ते सलग तीनद गावचे सरपंच राहिले.
ग्रामपंचायत हाती आल्यानंतर त्यांनी या गावाचा कायापालट करत विकास कामांचा सपाटा सुरु केला. या सेवाभावी वृत्तीमुळे ग्रामपंचायतीला शासनाचे जिल्हा आणि विभागीय स्तरावरील विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्या मृत्यूने गावाच्या विकासाला खिळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु संभाजी ब्रिगेड देखमुख कुटुंबियांच्या पाठीशी ठाम उभे राहून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देईल. तसेच या घटनेचा मास्टरमाईंडला समाजासमोर आणून बहुजन समाज एकसंघ राहिल या दृष्टीने काम करेल अशी ग्वाही दिली.
बीडचा बिहार होऊ देणार नाही : राजेश परकाळे
देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांतवन केले असले तरी बीड जिल्हा हा दहशत मुक्त करुन बीडचा बिहार होण्यापासून वाचविण्यासाठी संभाजी ब्रिगेड काम करेल. संभाजी ब्रिगेड ही ऐक वैचारीक व बहुजन समाजाची चळवळ आहे. विकृत व्यक्तीने केलेले कृत्य जाती – पातीत न ओढता. खून करणार्या नराधमांना फाशीची शिक्षा होत नाही व खूनाचे सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत संभाजी ब्रिगेड देखमुख कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे सक्षमपणे उभा राहील असे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी म्हंटले आहे.
आरोपींना कठोर शासन करावे : शशिकांत कन्हेरे
केज तालुक्यातील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या मारेकर्यांन तातडीने अटक करावे आणि या प्रकरणाची पाळेमुळे शोधून आरोपींना कठोर शासन करावी, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. मस्साजोग येथील अमानुष्य घटना ही निदनीय आहे. या घटनेचा मास्टरमाईंड तातडीने ताब्यात घ्यावा व त्याला कडक शासन व्हावे यासाठी संभाजी ब्रिगेड पुर्ण ताकदीने देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे असे कन्हेरे म्हणाले.