संघार्ध्योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर साखर कारखाना गळीत हंगामाचा शुभारंभ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बोधेगाव : केदारेश्वर बाबत बेछूट आरोप करणाऱ्या सचिन घायाळ यांच्या आपल्या वडिलांनीच ऊस तोडणी कामगाराच्या आगावू पेमेंट मध्ये कमिशन लाटले गेल्यामुळे कामगार कामावर वेळेत आले नसल्याने तुम्हाला हंगाम आटोपता घ्यावा लागला, त्याचा आर्थिक फटका आपणास बसला हे तपासूनच दुसऱ्यावर गंभीर आरोप करावेत, असा सल्ला उपाध्यक्ष माधव काटे यांनी दिला.
संघार्ध्योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा व गळीत हंगामाच्या शुभारंभ उपाध्यक्ष माधव काटे यांच्या प्रमुख उपस्थित गुरुवारी करण्यात आला आहे. स्वप्नील दौंड यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी बोलताना उपाध्यक्ष काटे म्हणाले सचिन घायाळ यांना २०१९ पूर्वी केदारेश्वर भाडेत्वावर चालविण्यास दिला होता ऊस तोडणी कामगारासाठी आगावू पेमेंट दिले होते त्यामध्ये स्वत घायाळ यांच्या वडिलांनी कमिशन लाटल्याने तोडणी कामगार हंगामात वेळेवर आले नाही त्यामुळे गळीत हंगाम अडचणीत सापडला गेला. हे निवडणुकीत भाडोत्री सुपारी घेवून भाषण करणाऱ्या सचिन घायाळ यांनी अगोदर तपासून दुसऱ्यावर बेशुट गंभीर आरोप करावेत असा सल्ला उपाध्यक्ष माधव काटे यांनी दिला आहे निवडणुकीत ज्यांनी भाडोत्री वक्ते आणले त्यांनाही जनतेनी त्यांची जागा निवडणुकीत दाखवली साधी अनामत रक्कम टिकवता आली नसल्याचे श्री काटे म्हणाले.
केदारेश्वर कारखाना अडचणीत आणण्यासाठी मोठा प्रयत्न झाला पण प्रतापराव ढाकणे,अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे व संचालक मंडळाने अडचणीवर मात करून शेतकऱ्यांचे थकित देणे दिले आहे चालू हंगामात नोंद केलेल्या संपूर्ण उसाचे गाळप केले जाणार आहे डोळ्यासमोर अनेक मोठे आव्हान उभे असून सर्वांना मोठ्या जिद्दीने व एकत्रितपणे सामोरे जावे लागणार आहे, त्यासाठी सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, प्राधान्याने ऊस पुरवठा करावा तसेच कामगार ,वाहतुकदार या सर्वांनी हंगाम यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचे अहवान माधव काटे यांनी यावेळी केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे यांनी चालू हंगामाचा आढावा घेतला
यावेळी कार्यक्रमास जेष्ठ संचालक सुरेशचंद्र होळकर, त्रिंबक चेमटे, शहादेव पातकळ , बापूराव घोडके, नवनाथ केदार, शहाजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अश्विनीकुमार घोळवे
प्रभारी कार्यकारी संचालक, रमेश गर्जे, मुख्य अभियंता प्रवीण काळोशे, तीर्थराज घुंगरड, पोपटराव केदार, अभिमन्यू विखे, कामगार संचालक शरद सोनवणे, माऊली दसपुते
यांच्यासह अधिकारी शेतकरी आदी उपस्थित होते.