बाळासाहेब खेडकर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बोधेगाव : संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या १९ जागेसाठी एकूण ४९ उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यापैकी ३० जणांनी अखेरच्या दिवसापर्यंत अर्ज माघार घेतल्याने सदर निवडणुक बिनविरोध पार पडली असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी डॉ प्रवीण लोखंडे यांनी दिली आहेत.

बिनविरोध झालेले नवनिर्वाचित संचालक पुढीप्रमाणे बोधेगावं सर्वसाधारण गटातून उपाध्यक्ष डॉ प्रकाश घनवट, बाळू फुंदे. हातगाव सर्वसाधरण गटातून- भाऊसाहेब मुंडे, सुरेशचंद्र होळकर, अशोक तानवडे, मुंगी सर्वसाधारण गटातून- बापूराव घोडके, श्रीमंत गव्हाणे, रणजित घुगे
चापडगाव सर्वसाधारण- गटातून- शिवाजी जाधव, पांडूरंग काकडे, सदाशिव दराडे, हसनापुर सर्वसाधारण गटातून ऋषिकेश प्रतापराव ढाकणे, माधव काटे, तर उत्पादित सहकारी संस्था प्रतापराव बबनराव ढाकणे
मतदारअनुसुचित जाती जमाती मतदासंघांतून सुभाष खंडागळे, महिला राखीव मधून विद्यमान संचालिका मिना संदिप बोडखे, सुमन मोहन दहिफळे, तर इतर मागासर्गीय मतदासंघातून तुषार वैद्य, भट्क्या जाती जमाती मधून त्रिंबक चेमटे, या प्रमाणे नवनिर्वाचित संचालक बिनविरोध झाले आहेत. यामध्ये ऋषीकेश ढाकणे, शिवाजी जाधव, पांडूरंग काकडे, सदाशिव दराडे, अशोक तानवडे यांना नव्याने संधी दिली आहे. तर पुन्हा १४ विद्यामान संचलकाना संधी दिली गेली आहे तर ऐनवेळी हातगाव गटातून अशोक तानवडे यांचा अर्ज कायम ठेवल्याने विद्यमान संचालक विठ्ठल अभंग यांचा ऐनवेळी अर्ज मागे घेतला गेला आहे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे व सत्ताधारी संचालक मंडळ प्रयत्नशील होते. सहकारात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठीं अखेर त्यानी यश मिळवले गेले आहे.
ऊस उत्पादांना चालू गळीत हंगामाचे संपूर्ण पेमेंट अदा केले असून पुढील हंगाम, व नव्याने हाती घेतलेला इथेलॉन प्रकल्प यशस्वीपणे सुरू करण्यासाठीं जोरदार प्रयत्न सुरू असून सहकारात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून ऊस उत्पादक, शेतकरी व सभासद ,कामगारांच्या हित जोपासण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची महिती अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी देवुन अर्ज माघार घेणारांचे आभार मानले निवडणुक निर्णय अधिकारी डॉ प्रविण लोखंडे, यांना शेवगावचे साहाय्यक निबंधक लूनावत, गाहिणीनाथ विखे यांनी सहकार्य केले.
Rahul Gandhi news