👉१५ मे पासून अर्ज दाखल करणे दि १८ जुन ला मतमोजणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बोधेगाव : पाथर्डी तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची सन २०२३ ते २०२८ साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे १५ मे ते १९ मे , दि २२रोजी छाननी, दि २३ रोजी अर्ज मागे घेणे, दि ७ जून चिन्ह वाटप करणे, दि, १८ जुन मतदान तर दि १९ जुन रोजी मतमोजणी.

बोधेगाव गट २ ,हातगाव ३मुंगी ३, चापडगाव ३, हसनापुर २, उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था १, अनुसूचित जाती, अनु जमाती, प्रतिनीधी १, महिला प्रतिनिधी २, इतर मागासवर्ग १, भटक्या विमुक्त जाती, जमाती विशेष मागासप्रवर्गातील १, अश्या संचालक मंडळाच्या एकूण १९ जागेसाठी हा निवडणुक कार्यक्रम जाहिर केला आहे. या प्रमाणे निवडणुक कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी मिलिंद भालेराव, तथा प्रादेशिक सह संचालक साखर, अहमदनगर, डॉ पी एल खंडागळे सचिव, राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे, निवडणुक निर्णय अधिकारी डॉ प्रवीण लोखंडे यांनी जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकिय हालचालींना वेग येणार आहे सध्या हा कारखाना राष्ट्रवादीचे प्रतापराव ढाकणे यांच्या ताब्यात असून विरोधी भाजपा आ मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे काय भुमिका घेऊन निवडणुकीची रणनिती आखतात, याकडे लक्ष लागले आहे.
संकलन : बाळासाहेब खेडकर, बोधेगाव