संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – राज्यात बंदी असणाऱ्या गोवंशीय जातीचे १ हजार किलो गोमांस आणि वाहतूक करणारा एक महिंद्रा झायलो कार व एक टेम्पो असा एकुण ८ लाख ५० हजार रु किंमतीचा व गोमांस वाहतूक करणाऱ्यास संगमनेर येथून ताब्यात घेण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे्.
एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि अनिल कटके यांना जिल्ह्यातील अवैधधंद्याचे समूळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने एलसीबीचे पोनि अनिल कटके यांनी एलसीबीचे सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, सचिन आडबल, संतोष लोढे, राहुल सोळुंके, संदीप चव्हाण व चापोहेकॉ बबन बेरड आदिंच्या ‘टिम’ला मिळालेल्या माहितीनुसार खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
एलसीबी टिम’ने संगमनेर पोलीस ठाण्याचे अंमलदार यांचे मदतीने दोन पंचाना सोबत घेऊन रहेमतनगर, जोर्वे रोड, (ता. संगमनेर) येथे जाऊन रोडवर सापळा लावुन थांबलेले असतांना माहितीनुसार महिंद्रा झायलो व छोटा हत्ती टेम्पो येताना दिसले चालकास बॅटरीने लाईट दाखवून थांबण्याचा इशारा करताच झायलो चालकाने गाडी थांबवली. पोलीस पथकाची चाहुल लागताच पाठीमागे असलेला छोटा हत्ती टेम्पो मधील चालक गाडी सोडून पळून गेला. त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. ताब्यात घेतलेल्या झायलो चालकास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नावे सलमान नजीर शेख ( वय २०, रा. नाईकवाड पुरा, ता. संगमनेर) असे सांगितले. त्यास छोटा हत्ती टेम्पो वरील पळून गेलेल्या चालकाचे नाव व पत्ता विचारला असता त्याचे नाव बुंदी ऊर्फ मुद्दसर करीम कुरेशी (रा. भारतनगर, ता. संगमनेर) असे असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातील महिंद्रा झायलो कार व छोटा हत्ती टेम्पोची पंचासमक्ष झडती घेता, त्यामध्ये गोमांस मिळून आले. गोमांसची खात्री करता ते गोवंश जनावराचे मांस असल्याचे निष्पन्न झाल्याने ताब्यातील सलमान शेख याच्याकडे वाहनातील गोमांसबाबत विचारपुस करता तो समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी करता त्याने दोन्ही वाहनातील गोमांस हे बुंदी ऊर्फ मुद्दसर करीम कुरेशी याच्या मालकीचा आहे. ते विक्री करण्यासाठी घेऊन चाललो असल्याची कबुली दिली.
गोमांस, वाहतुकीसाठी वापरलेला एक महिंद्रा झायलो कार व एक छोटा हत्ती टेम्पो असा सर्व मुद्देमाल जप्त केला. एलसीबीचे पोना सचिन आडबल यांच्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १०२९/२०२२ भादविक २६९,३४ सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कलम ५ (क),९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई संगमनेर शहर पोलिस करीत आहेत.