संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
संगमनेर ः तालुक्यातील काकडवाड येथील महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून, मंदिर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीतील 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 26 लाख 12 हजार 900 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्याची महत्वाची कामगिरी अहिल्यानगर क्राईम ब्रॅँचने केली आहे. सुयोग अशोक दवंगे (वय 21, रा.हिवरगाव पावसा, ता.संगमनेर जि.अहिल्यानगर), संदीप किसन साबळे (वय 23, रा.पाचपट्टावाडी, ता.अकोले, जि.अहिल्यानगर), संदीप निवृत्ती गोडे (वय 23, रा.सोमठाणे, ता.अकोले, जि.अहिल्यानगर), अनिकेत अनिल कदम (वय 21, रा.टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे), दीपक विलास पाटेकर (वय 24, रा.टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे), सचिन दामोदर मंडलीक (वय 29, रा.संगमनेर, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, संगमनेर डिवायएसपी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅँचचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार सपोनि हेमंत थोरात, पोलीस अंमलदार सागर ससाणे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे यांच्या व तपास पथकातील सपोनि हेमंत थोरात व पोलीस अंमलदार सागर ससाणे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे यांचे यांच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शनिवारी दि.8 मार्च 2025 रोजी रात्री श्री.महालक्ष्मीमाता मंदीर (काकडवाडी, ता.संगमनेर) या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा व गाभार्याचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप, चांदीचे टोपामधील सोन्याचे पान, मूतींचे गळयातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने 24 लाख 94 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले आहे, याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.116/2025 बीएनएस 331 (4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
या घटनेच्या ठिकाणी एसपी राकेश ओला यांनी स्वत: भेट देऊन मंदिर चोरीचे गुन्हयाचे गांभीर्य व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन लागलीच अहिल्यानगर क्राईम ब्रॅँच पोनि दिनेश आहेर यांना गुन्हयाचा समांतर तपास करून गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.
आदेशान्वये पोनि श्री.आहेर यांनी घटनाठिकाणी भेट देऊन आरोपींची गुन्हा करण्याची कार्यपध्दतीची माहिती घेऊन अहिल्यानगर क्राईम बॅ्रंच टीमने गुन्ह्याचे तपासात घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना दि.13 मार्च 2025 रोजी गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे (रा.हिवरगाव पावसा, ता.संगमनेर) याने त्याच्या साथीदारासह केल्याचे उघड झाले. क्राईम बॅॅँ्रच टीमने सुयोग अशोक दवंगे याची गोपनिय माहिती घेतली. तो त्याचा साथीदार सचिन मंडलीक याच्या मध्यस्थीने गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळे रंगाची फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार (एमएच 4 एचएफ 1661) मधून संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची माहिती मिळाली. क्राईम ब्रॅँच टीमने तात्काळ लोणी ते कोल्हार जाणारे रोडवरील सापळा रचून थांबलेले असताना संशयित कार मिळून आल्याने ती थांबविण्यात आली.गाडी रस्त्याच्या बाजूला घेत असताना कारमधून तिघे पळून जाऊ लागले. क्राईम ब्रँच टीमने त्याचा पाठलाग करून त्यांना व कारमधील आणखी ितिघे अशा एकूण सहाजणांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सांगितली.
क्राईम बॅ्रंच टीमने पंचासमक्ष ताब्यातील त्या सवार्र्ंची अंगझडती घेतली, या दरम्यान त्याच्या ताब्यातून 26 लाख 12 हजार 900 रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 199 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागीने, 1 हजार 665 ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध दागिने (पान, मुकूट, मणी, नेकलेस, कंबर पट्टा, चैन, नथी, मूर्ती, पादुका, छत्री, पंचारती इ.), 3 मोबाईल व एक फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार (क्र. एमएच,4 एचएफ1661) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी सुयोग अशोक दवंगे याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली, त्याने वर पकडण्यात आलेल्या सवार्र्ंसह दि.8 मार्च 2025 रोजी रात्री व दि.9 मार्च 2025 रोजी पहाटे काकडवाडी (ता.संगमनेर) येथील महालक्ष्मी मंदीरात चोरी केली. आणखी कोठे गुन्हे केले आहेत, काय याबाबत विचारपूस केली असता त्याने दि.6 मार्च 2025 रोजी रात्री कुंदेवाडी (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथील बालाजी मंदीर व सिन्नर येथील पुणे ते नाशिक रोडवरील वज्रेश्वरी मंदीरात चोरी केल्याची माहिती दिली. चोरी केलेला मुद्देमाल हा सचिन दामोदर मंडलीक याच्या मध्यस्थीने विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती सांगितली.
ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. गुन्हयाचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस हे करीत आहेत. ताब्यातील आरोपींनी नाशिक येथे केलेल्या मंदिर चोरीबाबत पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.