सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील श्री वामनभाऊ विद्यालयात आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. वय वर्ष (६)सहा ते (१४) चौदा वयोगटातील सर्व मुलांची शाळेत १०० % रोज पटनोंदणी व्हावी या उद्देशाने शाळेच्या प्रथम दिवशी ‘शाळा प्रवेशेात्सव कार्यक्रम’ मोठ्या उत्साहात होत असतात.असाच उत्साही वातावरणात पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील एकलव्य शिक्षण संस्थेचे श्री वामनभाऊ विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत वामभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच श्रीफळ वाढवून करण्यात आली.
यावेळी इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री नरोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलतांना श्री नरोडे यांनी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील उपयोगी पडतील असे करिअर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार सोमराज बडे हे होते. प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत आज उत्साही वातावरणामध्ये विद्यालयात शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली.यावेळी बोलताना सोमराज बडे यांनी सांगितले की कोणत्याही कामामध्ये यशस्वी व्हावयाचे असेल तर त्याची सुरुवात नेहमी चांगली करावी लागते. त्याप्रमाणे शाळेमधील आजचा शाळा प्रवेशाचा कार्यक्रम पाहता आपली शाळा व विदयार्थी नक्कीच गगनभरारी घेतील, आणि गावची व पालकांची मान उंचावतील अशी आशा वाटते.
आज शाळेच्या प्रथम दिनानिमित्त विद्यालयात इयत्ता पाचवी ला प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नरोडे सर व मान्यवरांच्या हस्ते पुस्तक संच, पेन,वही व गुलाब-पुष्प देवून स्वागत केले. यावेळी अशोक अबिलढगे,बबन बडे,गणेश बडे,विष्णू राजगुरू,रामदास बडे,डॉ बांगर,बाबासाहेब राजगुरू,गर्जे मॅडम,अकोलकर सर,श्री म्हस्के, यांचेसह इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक श्री नरोडे यांनी केलीे. तर सूत्रसंचालन श्री मर्दानेसर यांनी आभार प्रदर्शन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री घुले यांनी केले.