संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील श्री वामनभाऊ विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी इयत्ता दहावीचा निकाल ९८.४१ टक्के इतका लागला आहे. विद्यालयातील एकूण ६३ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. यापैकी ६२ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत.,०७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत यश संपादन केले आहे .तर २६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी. द्वितीय श्रेणीत २६ विदयार्थी आणि ३विद्यर्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी घेत यशस्वी झाले आहेत.या परीक्षेत प्रथम क्रमांक कु.बडे सरिता रामदास.८४.४० टक्के (४२२),
द्वितीय चि.राजगुरू धनंजय विष्णू ८२.४०टक्के (४१२),तर तृतीय क्रमांक कु. वाघमारे वैष्णवी बाळू. हिने ८१.६०टक्के (४०८) गुण मिळवत यश मिळवले आहे.
सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे एकलव्य शिक्षण संस्थेचे सचिव ऍड.प्रतापराव ढाकणे, जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे,संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नरोडे सर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, पालक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करत विदयार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
संकलन : सोमराज बडे