संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : तालुक्यातील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानचे नूतन विश्वस्त मंडळ हे २०२२-२०२५ या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वें यार्लगड्डा यांनी जाहीर केले.
यामध्ये मोहटे गावातील पाच विश्वस्त याप्रमाणे शिशिकांत रामनाथ दहिफळे, बाळासाहेब किसन दहिफळे, सौ प्रतिभा नितीन दहिफळे, विठ्ठल अजिनाथ कुटे, अक्षय राजेंद्र गोसावी.
मोहटेगाव व्यतिरिक्त भाविकांमधून पाच विश्वस्त याप्रमाणे श्रीराम गंगाधर परतानी (पुणे), ॲड.कल्याण दगडू बडे (औरंगाबाद), डॉ श्रीधर मधुकर देशमुख (पाथर्डी), श्रीमती अनुराधा विनायक केदार (पाथर्डी), ॲड विक्रम लक्ष्मण वाडेकर (अहमदनगर)
निवड झालेल्या विश्वस्तांचे श्री मोहटादेवी देवस्थानचे चेअरमन तथा अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश- १ सुनील गोसावी, पाथर्डीच्या दिवाणी न्यायाधीश तथा पदसिद्ध विश्वस्त अश्विनी बिराजदार, उपवनसंरक्षक अहमदनगर सुवर्णा माने, पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर, प्रभारी गटविकास अधिकारी डॉ जगदीश पालवे यांनी अभिनंदन केले.