संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – शेवगाव येथील पुरातन अशा श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी नगर शहर शिवसेनेचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांचे चिरंजीव ओंकार दिलीप सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदासाठीच्या रिक्त दोन जागांसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालय, नगर यांच्या स्तरावर मुलाखत प्रक्रिया होवून सामाजिक व धार्मिक कार्याची आवड तसेच शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन मुलाखतीद्वारे या कार्यालयाने ओंकार सातपुते यांची निवड केली आहे.
या निवडीबद्दल शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन जाधव, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, पदाधिकारी बाबुशेठ टायरवाले, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, भगवान फ लसौंदर, बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, मदन आढाव, योगेश गलांडे, आकाश कातोरे आदींनी ओंकार यांचे अभिनंदन केले आहे.