शेवगाव-पाथर्डी वाढत्या घरफोडी,चो-यांच्या पाश्र्वभूमीवर ‘नगर एलसीबी’ची कारवाई : ३ अटक

शेवगाव-पाथर्डी वाढत्या घरफोडी,चो-यांच्या पाश्र्वभूमीवर ‘नगर एलसीबी’ची कारवाई : ३ अटक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : शेवगांव व पाथर्डी परिसरामध्ये वाढत्या गुन्हेगारीसह घरफोडी सारख्या घटनांमध्ये सर्रास वाढ झाली आहे. या दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणात वाढ होत असल्याने नगर पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर घरफोडी करणारी टोळी नगर पोलिसांनी पकडली आहे. या टोळीकडून ६ लाख ६३ हजार ५०० रुपये किमतीच्या ९४.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. लखन विजय काळे (वय २२, रा. शेवगांव, ता. शेवगांव), गोरख हैनात भोसले (वय २४, रा. घोसपुरी, ता. जि. अहमदनगर), सोनाजी एकनाथ गर्जे (वय ५२, रा. गर्जेवस्ती, गेवराई रोडे, शेवगांव, ता. शेवगांव) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. ४ जुलै २०२४ रोजी सकाळी त्यांचे घराचा दरवाजा बंद करुन शेतामध्ये शेतकामासाठी गेले असता कोणीतरी अनोळखी आरोपींनी घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करुन घरातील पत्र्याचे पेटीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेलेला होता, या महादेव मुरलीधर मुंढे (रा. पिंगेवाडी, ता. शेवगांव जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून शेवगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 566/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(a), 331 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या दाखल गुन्ह्यानंतर एसपी राकेश ओला यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत तसेच अहमदनगर जिल्ह्यामधील मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करणेबाबत आदेश दिलेले आहेत. या आदेशान्वये एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भाऊसाहेब गोविंद काळे, रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, अमोल कोतकर, भाऊसाहेब राजु काळे, बाळासाहेब खेडकर, संतोष खैरे, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर यांची टिम तयार करुन मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेकामे सूचना दिल्या होत्या.
एलसीबी टिम’ने अहमदनगर जिल्ह्यामधील यापूर्वी घरफोडीचे गुन्ह्यातील निष्पन्न झालेल्या आरोपींची माहिती संकलित करुन त्यांच्या सध्याचे हालचालीची माहिती काढत असतांना दि.८ जुलै २०२४ रोजी गुन्हा हा लखन विजय काळे (रा. शेवगांव, ता. शेवगांव) व त्याचे इतर साथीदारांनी केला असून तो गुन्ह्यातील चोरीचे सोने एका मध्यस्थीमार्फत विकण्यासाठी सरकारी दवाखान्याजवळ, शेवगांव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबी टिम’ने शेवगांव ते गेवराई जाणारे रोडवरील सरकारी दवाखान्याजवळ, शेवगांव, (ता. शेवगांव) येथे जाऊन सापळा रचून थांबले असता सरकारी दवाखान्याकडे 3 संशयीत येतांना दिसले. एलसीबी टिम’ने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे लखन विजय काळे (रा. शेवगांव, ता. शेवगांव), गोरख हैनात भोसले (रा. घोसपुरी, ता. जि. अहमदनगर), सोनाजी एकनाथ गर्जे ( रा. गर्जेवस्ती, गेवराई रोडे, शेवगांव, ता. शेवगांव) असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेता सोनाजी एकनाथ गर्जे याच्या कब्जामध्ये ६ लाख ६३ हजार ५०० रुपये किमतीचे ९४.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले आहे. सोन्याचे दागिने व रोख रकमेबाबत त्याचेकडे विचारपुस करता त्याने सदरचे दागिने हे लखन विजय काळे व गोरख हैनात भोसले यांनी त्याच्याकडे विकण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. लखन विजय काळे व गोरख हैनात भोसले यांनी सदरचे दागिने कोठून आणले याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी दागिने निवडुंगे, शिरसाठवाडी व जोगेवाडी, (ता. पाथर्डी), चांदगांव व पिंगेवाडी, (ता. शेवगांव) तसेच शेवगांव शहरातून घरफोडी चोरी करुन आणले असल्याचे सांगितले.
ताब्यातील आरोपींकडून खालीलप्रमाणे एकूण ६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असुन पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

 

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!