शेवगाव – पाथर्डी तालुक्यातील थांबलेल्या विकासाला चालना देण्यासाठी एकदा संधी द्या : प्रतापकाका ढाकणे
अहिल्यानगर येथे शेवगाव -पाथर्डी मतदार संघातील नागरिकांच्या मेळावा व स्नेहसंमेलन उत्साहात
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : शेवगाव – पाथर्डी तालुक्यातील थांबलेल्या विकासाला चालना देण्यासाठी 30 वर्षाच्या संघर्षात मला एकदा संधी द्या, आशिर्वाद द्या, असे आवाहन शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस प्रतापकाका ढाकणे यांनी केले.
अहिल्यानगर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शेवगाव -पाथर्डी मतदार संघातील नागरिकांच्या मेळावा व स्नेहसंमेलनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दादा महाराज नगरकर, रामराव चव्हाण, भिमराव खाडे यांच्यासह् मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान अनेक ज्येष्ठांनी कै.माजीमंत्री बबनराव ढाकणे यांच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी कसा संघर्ष करुन पाथर्डी तालुक्यात पाण्यासाठी बंधारे, नालाबांध, वाड्यावस्त्यांवर रस्तेसह् वीज उपलब्ध करून दिली. तसेच शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या असल्याच्या जुन्या इतिहासाला उजाळा देण्याचे काम केले. तत्पूर्वी सर्वच मान्यवर व्यक्तींनी मेळाव्यात उपस्थित नागरिकांना यापुढे शेवगाव – पाथर्डी तालुक्याचा विकास करण्यासाठी व आपला माणूस म्हणून प्रतापकाका ढाकणे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत बहुमताने निवडून द्या, असे आवाहन केले. यावेळी सूत्रसंचालन प्रा.अमोल खाडे यांनी केले.
मेळाव्यास यावेळी बाळासाहेब जाधव , श्री मिसाळ, श्री बडे गुरुजी, पत्रकार अशोक बडे, महेंद्र गर्जे, बंडू बोरुडे, श्रीमती हिरा देवढेताई, डॉ श्रीकांत चेमटे, संतोष बडे , किशोर कजबे, भिमराव खाडे आदिंसह शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील अहिल्यानगरला राहाणारे नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.