निलेश ढाकणे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
शेवगाव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त काल शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकी दरम्यान दोन गटात दगडफेक झाली, दगडफेकी मध्ये दुकाने, वाहन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दगडफेकी वेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी लाठीचार्ज केला, यात चार पोलीस कर्मचारी सुध्दा जखमी झाले आहेत. या दरम्यान शेवगाव पोलीस पुढील तपास करत असून सीसीटीव्हीच्या आधारे समाजकंटकाचा शोध घेतला जात आहे.दीडशेच्या आसपास अज्ञात समाजकंटकावर गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यत ६० जणांना ताब्यात घेतल्याचे प्राथमिक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दगडफेक कुणी केली?
मिरवणूक रात्री आठच्या दरम्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचली तेव्हा मिरवणुकीच्या दिशेने अचानक दगडफेक सुरू झाली असे मिरवणुकीत सहभागी असलेल्या गटाचे म्हणणे आहे. तर, आमच्या धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक झाली असे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. सुरवातीला दगडफेक झाल्याची अफवा पसरली आणि या अफवेमुळे प्रत्यक्षात दगडफेक झाल्याचे एका प्रत्यक्षदर्शी ने सांगितले.
👉मोठ्या प्रमाणात नुकसान
दगडफेकी मुळे शहरातील मुख्य बाजार पेठेतील व्यावसायिकांच्या दुकानाचे, तसेच पार्कींग केलेल्या दुचाकी-चारचाकी वाहणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार छगन वाघ, प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या पोलिसांनी घटना स्थळाला भेट देऊन घटनेची पाहणी केली.
👉राज्य राखीव दलाला पाचारण
शहरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून राज्य राखीव पोलीस दलाच्या एका तुकडीला पाचारण करण्यात आले आहे.
👉शहरात तणाव पूर्ण शांतता
रात्रीच्या घटनेनंतर सोमवारी शहरात बंद पाळण्यात येत असून, व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवली आहेत.