संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठीच, शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा करुणा मुंडे यांची गुरुवारी (दि.२३) घोषणा अहमदनगर येथे पञकार परिषदेत केली.
श्रीमती मुंडे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात कोट्यवधीचा घोटाळे झाले आहेत. महाराष्ट्रासाठी मी वेगळे करण्याची इच्छा आहे. यासाठी अहमदनगर येथे पक्षाचा मेळावा दि.३० जानेवारीपर्यत घेण्यात येणार आहे. त्या मेळाव्यातच पक्षाचा निशाण व चिन्ह जाहीर करणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीस गेलो असता त्यांची भेट झाली नाही. परंतु श्री हजारे यांचा भ्रष्टाचार मुक्तीचा नारा आहे. तोच नारा आमचा असल्याने त्याचे आशिर्वाद घेण्यासाठी आमची भेट होती, श्रीमती मुंडे म्हणाल्या.