संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : दि. १० मार्च २०२३ ला तिथीप्रमाणे शिवजयंती मिरवणुकीस वेळ मर्यादा २ तास शिथील करून रात्री १२ वाजेपर्यंत ध्वजीक्षेपक मिरवणुकीस परवानगी मिळण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव आदिंनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दि. १० मार्च २०२३ रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव आहे. नगर शहर शिवसेना सालाबादप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करणार आहेत. मिरवणुकीत इतर धार्मिक सणांना वाढवून दिलेल्या कालमर्यादेनुसार २ तास शिथील करून रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक पारंपारिक वाद्य वाजविण्यास व मिरवणुकीस परवानगी द्यावी, असे म्हटले आहे.