शिर्डी ग्रामदैवत मंदिर शिर्डी साईबाबा संस्थानने ग्रामस्थांकडे वर्ग करा ; शिर्डी ग्रामस्थांचा एकमुखी ठराव
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी (कविता भराटे) : शिर्डी साईबाबा संस्थानला नुकतेच शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेचा ठराव देण्यात आला की शिर्डीतील ग्राम मंदिरे पूर्वी साईबाबा संस्थान कडे दिले होते ते पुन्हा शिर्डी ग्रामस्थांकडे वर्ग करावे. असे संस्थांचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना दिलेल्या ठरावात म्हटले आहे.
शिर्डी ग्रामस्थांच्या मालकीचे असलेले ग्रामदैवत श्री गणपती, श्री शनि महाराज, श्री महादेव, श्री हनुमान मंदिर हे मंदिरे शिर्डी नगरपंचायत सर्वसाधारण सभा ठराव क्रं.२३, दि.४ मार्च २००२ नुसार आम्ही ग्रामस्थांनी श्री साईबाबा संस्थानकडे देखभाल करणेसाठी दिली होती. त्यावेळेस ग्रामस्थांकडे देखभाल यंत्रणा नसल्यामुळे आपल्याकडे देण्यात आली होती. आम्ही शिर्डी ग्रामस्थ यांनी दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी राहाता
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती
ज्ञानेश्वर गंगाधर गोंदकर तथा शिर्डी नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन विविध विषयावर चर्चा करुन एकमताने सर्व विषय मंजूर केले आहे. त्यावेळेस संस्थान प्रतिनिधी व शासकीय अधिकारी हजर होते.
ग्रामसभेत शिर्डी ग्रामदैवत श्री गणपती, श्री शनी महाराज, श्री महादेव, श्री हनुमान मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री खंडोबा मंदिर व अन्य छोटे मोठे मंदिर यांचा अहिल्यानगर धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत न्यास करुन त्याद्वारे मंदिराचे देखभाल दुरुस्ती व व्यवस्थापन पहाणार आहे. मंदिरातून येणा-या देणग्या या धर्मादाय आयुक्त, अहिल्यानगर यांच्या देखरेखीखाली शिर्डीच्या विकासासाठी व सार्वजनिक उत्सव, सण साजरे करण्यासाठी वापरणार आहोत. तसेच शिर्डीकरांची भावना आहे की, गावाची ग्रामदैवते हे ग्रामस्थानींच सांभाळावेत. शिर्डी मध्ये होत असलेल्या अप्रिय घटना या ग्रामदैवतांची योग्य देखभाल, पुजा-अर्चा न केल्यामुळे होत आहे, असा ग्रामस्थांचा समज आहे.
शिर्डी ग्रामदैवत मंदिरे शिर्डी ग्रामस्थांच्या ताब्यात घेणेस मंजूरी देण्यात येत आहे. याबाबत कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान यांना कळविणेस व मा.धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणीकरीता पुढील कार्यवाही करणेस मंजूरी देण्यात येत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाला सूचक शिर्डी नगरपरिषद माजी नगराध्यक्ष कैलास (बापू) गोविंदराव कोते, अनुमोदक शिर्डी नगरपरिषद नगराध्यक्ष शिवाजी अमृतराव गोंदकर, ग्रामसभा अध्यक्ष
ज्ञानेश्वर (आबा) गंगाधर गोंदकर हे आहेत. या ठरावाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा., अध्यक्ष, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी, जिल्हाधिकारी, अहिल्यानगर, मा.खा. सुजय विखे पा., मा.खा. भाऊसाहेब वाकचौरे आदींना पाठविण्यात आल्या आहेत.