शिरूर कासार येथे धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी, मागणीसाठी रस्तारोको
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बीड : धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी राज्यव्यापी रस्तारोको आंदोलन हे महाराष्ट्रभर करण्यात आले.
धनगर एसटी आरक्षणासाठी पंढरपूर नेवासा आणि लातूर या ठिकाणी धनगर समाज उपोषणकर्ते धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणास बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी धनगर समाज शिरूर कासार यांच्यावतीने जिजामाता चौक शिरूर येथे रास्तारोको आंदोलन करून निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.