शिरसाटवाडीस दोन कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी :
तालुक्यातील शिरसाटवाडी गावास केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेतून दोन कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून शिरसाटवाडी गावचा पुढील पन्नास वर्षाचा पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सरपंच सौ.भावना अविनाश पालवे यांनी सांगितले.

मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रा. पं. सदस्य अविनाश पालवे यांनी सांगितले की ” ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर जलजीवन मिशन योजनेच्या तालुका आराखड्यामध्ये शिरसाटवाडीचे नावच नाही आपले गाव या योजनेपासून वंचित राहणार आहे हे लक्षात आल्यानंतर तात्काळ ३० मार्च २०२१ रोजी ग्रामपंचायतकडून पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाला या योजनेत शिरसाटवाडी गावाचा समावेश व्हावा यासाठी पत्र दिले यावर ग्रामपंचायतीच्या पत्रानुसार तात्काळ जि.प. पाणीपुरवठा विभागाला त्याच दिवशी ३० मार्च २०२१ रोजीच पंचायत समितीने पत्र दिले यानंतर जि.प. पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार पाठपुरावा सुरू केला तसेच तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची नगर येथे भेट घेऊन ग्रामपंचायतचे पत्र देऊन जलजीवन मिशन योजनेत शिरसाटवाडी गावाचा समावेश करावा अशी मागणी केली. यासाठी मनसे नेते तथा माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर यांनीही हसन मुश्रीफ यांना फोनवरून शिरसाटवाडीचा जलजीवन मिशन योजनेत समावेश करावा असे सांगितले होते. पाणीपुरवठा योजनेपासून आपले गाव वंचित राहू नये यासाठी वर्षभर केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले व केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेत शिरसाटवाडी गावाचा समावेश झाला चार महिन्यांपूर्वी २३ जुलै २०२२ रोजी गावात होणाऱ्या पाण्याच्या टाक्या व पाईपलाईन यांचा सर्वे करून घेतला. या योजनेतून गावठाण, मुंजोबानगर, पडकाचा मळा, खंडोबा माळ, घुले ढाकणे कोंगे वस्ती, शेकडे वस्ती, महादेव मळा, भैरवनाथ वस्ती यांसह गावच्या सर्व भागांमध्ये नव्याने पाईपलाईन होणार असून गावामध्ये दीड लाख लिटर क्षमतेची तर फाट्यावर साठ हजार लिटर क्षमतेची अशा दोन पाण्याच्या टाक्या चाळीस फूट उंचीवर बांधल्या जाणार असून यामुळे शिरसाटवाडी गावचा पुढील पन्नास ते साठ वर्षाचा पाणी प्रश्न सुटणार आहे आपले गाव व आपली माणसं या मोठ्या पाणीपुरवठा योजनेपासून वंचित राहणार नाहीत व गावातील प्रत्येक घराला पाणी देण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे याचा खूप आनंद होत असल्याचे सरपंच सौ.भावना अविनाश पालवे यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!