संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई ः शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर गणेश विर्सजन मिरवणूकीची तयारी पूर्ण झाली असून मंगळवार दि.17 रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी 8.30 वाजता जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते उत्थापन पुजेस प्रारंभ होईल. त्यानंतर मुख्य मिरवणुकीस श्री.विशाल गणेश मंदिर येथून प्रारंभ होईल. फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्रीगणेश मुर्ती असेल. तसेच सनई चौघडा, रुद्रनाद, युगंधर ढोल पथकाचे वादन तसेच ब्रम्हाश्त्र संस्थेच्या वतीने पारंपारीक खेळ सादर करण्यात येणार आहे. यामध्ये शिवकालीन खेळांचे प्रात्याक्षिक दाखविण्यात येणार आहे. पारंपारीक वाद्यांना गणेश मंडळानी प्राधान्य द्यावे, जेणे करुन ध्वनीप्रदूषणापासून गणेश भक्तांना त्रास होणार नाही. याची काळजी घेण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी केले आहे.
गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात मिरवणूक मार्गावर स्वागत करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडीतराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, खजिनदार पांडूरंग नन्नवरे, विश्वस्त रंगनाथ फुलसौंदर, हरिभाऊ फुलसौंदर, बापुसाहेब एकाडे, चंद्रकांत फुलारी, विजय कोथींबीरे, हरीचंद्र गिरमे, ज्ञानेश्वर रासकर, गजानन ससाणे, प्रा.माणिक विधाते, संजय चाफे, नितीन पुंड यांनी केले आहे. मिरवणूक यशस्वीतेसाठी श्री विशाल गणेश सेवा मंडळाचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.