व्यावसायिक यशस्वीतेच्या पायऱ्या (Setps for Professional Personality Development)

भाग – १

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork

जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हावे वाटत असते. यशस्वी होण्यासाठी निर्सगाने प्रत्येकाला तशी गुणसंपदा व शक्ती प्रदान केलेली असते. स्वतःच्या विकासासाठी, यशस्वीतेसाठी त्याचा उपयोग कसा करावयाचा याची उमज (जाण) बऱ्याच लोकांना नसते, म्हणूनच काहीच व्यक्ती यशस्वी झालेल्या दिसतात. अशा अनेक यशस्वी व्यक्तीमत्वांशी चर्चा केल्यावर असे जाणवते की, त्यांनी त्यांच्या क्षमतांचा व स्वतःचा अभ्यास करुन आपली ध्येय, उद्दिष्टे गाठली आहेत.
आपले वेगळे विश्व निर्माण केले आहे. ह्या आधुनिक यशाचे रहस्य, तंत्र व कानमंत्र त्यांनी चोखाळलेली पायपाट किंवा आधुनिक यशस्वीतेच्या पायऱ्या आपल्या सरावासाठी उपलब्ध करुन देत आहोत. आपणही सदरील पायवाट चोखाळून वारंवार वापरुन सराव केल्यास आपण ही जीवनात आपले ध्येय, उद्दिष्ठ निश्चितरित्या गाठून यशोशिखरावर विराजमान होवून कर्म संस्कृतीतून गरुड संस्कृतीमध्ये येवून यशस्वी गरुड भरारी घेऊ शकाल, यात तीळमात्र शंका नाही.

👉तरुणांना आव्हान : आपणच आपले गुरु व्हा !
जो अडचणींचे रुपांतर पायऱ्यांत करुन वरवर सरकतो तोच तरुण, आणि ज्याला पायरीचीही अडचण होते, तो म्हतारा होय. आयुष्याचा कोणताही कालखंड अडचणीविना नसतो. लहानपणी शाळेची कटकट असते. तारुण्यात इतरांच्या अपेक्षांचे ओझे असते आणि म्हतारपणी शारीरिक आणि मानसिक दौर्बल्य सतावत असते. म्हणून अडचणींचा बाऊ करणे तरुणांना शोभत नाही.
तरुणांनी भूतकाळ आणि भविष्यकाळ असतो. त्याच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतांचा पूर्ण विकास झालेला असतो. अशा परिस्थितीत अनुभव व आव्हाने यांची सांगड घातली तर तारुण्य सार्थकी लागते.
रोजच्या व्यवहारात निराश आणि नाराज करणारे अनेक प्रसंग असतात. हव्या असलेल्या घटना घडत नाहीत. नको असलेली माणसे समोर येऊन थांबतात. वेळेवर खाणे, पिणे होत नाही. यासारख्या घटना रोज घडतात. त्यांना डोक्यावर स्वार होऊ देणे, हा तारुणाचा उपमर्द आहे. त्यांची संभावना करणे हा पुरुषार्थ आहे. तरुण खरे तर तेजःपुंज असतो. तो तहान-भूक सहन करु शकतो. अडचणींवर मात करुन हाती घेतलेले कार्य पूर्ण करू शकतो. म्हणून तरुणांनी उद्योग व्यवसायात पडून एखादे काम सुरु करायला हवे. जगात खूप संधी आहेत. त्या स्थळ, काळ, व्यक्तिपरत्वे बदलतात. त्यामुळे त्यांना अचूक हेरुन कार्यवाही करणे हे यशस्वी पुरुषार्थाचे लक्षण आहे.

प्रत्येकाने उद्योगपती होण्याचे स्वप्न पाहणे सोडून आहे. प्रत्येकाने उद्योगी बनण्याचे स्वप्न पाहणे आणि त्यांच्या परिपूर्तीसाठी प्रयत्नशील राहणे याला समंजसपणा म्हणतात. शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणारे अनेक यशस्वी आदर्श व्यक्तिमत्वे असून त्यांचा आदर्श उपयोगी ठरतो. आपल्या मधील असणाऱ्या क्षमता, अंतर्मनातील सामर्थ्य ओळखून एखादे काम हाती घेतले, तर त्यात यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.
अंगमेहनत अटळ आहे. स्वतःचा व्यवसाय असला किंवा भागिदारी असली, तरी त्यात जातीने लक्ष घातल्याशिवाय यशस्वी होता येत नाही. शिपायापासून व्यवस्थापक-मालकापर्यंत सगळ्या भूमिका पार पाडताना शरीरश्रम हा धर्म मानायला हवा. व्यवसायात प्रगती होईल, तसतशा काही जबाबदाऱ्या दुसऱ्यावर टाकता येतील, सुरवातीला सर्व भूमिका आपणालाच वठवाव्या लागतात.


आजच्या तरुणांपुढे तथाकथित विद्वानांनी काळाचे आक्राळविक्राळ रुप सादर केले आहे किंवा झटपट श्रीमंतीचे मार्ग सांगितले आहेत. काळ भयानक आहे हे अर्धसत्य आहे आणि आपल्याला झटपट श्रीमंत होता येते, हे पूर्ण असत्य आहे. अयोग्य मार्गांनी पुढे आलेले तरुण तितक्याच अनिष्ट मार्गांनी मागे पडतात आणि संपूर्ण जीवनातच अपयशी ठरतात. म्हणून प्रथम आपणच आपले गुरु व्हा. मग प्रथम कामाला गुरु माना. कामातील इतर गुरु शोधा. स्वःवर विश्वास ठेवा. कुटुंबाच्या मदतीने वाटचाल चालू ठेवा. सुरवातीलाच ठेचा लागतील. वाटचाल सुरळीत व्हायला लागल्यावर समाज कुतूहलाने तुमच्याकडे बघितल्याशिवाय राहणार नाही. समाजात सर्व प्रकारची माणसे असतात, हे सूत्र ध्यानात ठेवून स्तुतीने हुरळून जाऊ नका किंवा टीकेने दबून जाऊ नका ‘चराति चरतो भगः’ चालणाऱ्याचे भाग्य चालते. बसलेल्याचे भाग्य अर्थातच बसलेले असते.

📥 व्यावसायिक यशस्वी जीवनाचे टिप्स :
१. कठोर परिश्रम करा, कारण तेच आपले उन्नती व संरक्षण करते.
२. स्वतःच्या प्रगतीसाठी नेहमी जागृत राहा.
३. आपले जीवन शिस्तबध्द, सुव्यवस्थित, व्यसनमुक्त व सुनियंत्रित ठेवा.
४. तत्कालिक आणि त्वरीत फलाची अपेक्षा करु नका.
५. जर आपल्याला सर्वश्रेष्ठ विजेता बनवयाचे असेल तर प्रथम हारणे शिका.
६. अधिक उत्पादन क्षमतेचे लक्ष्य ठेवा.
७. आपल्या भावना आणि विचारांवर नियंत्रण करण्याचे शिका. ८. जीवन व्यवहारात सद्विवेकपूर्ण आणि तर्कसंगत विचार व भावनांचा प्रयोग करा.
९. सातत्याच्या प्रयत्नाने स्वतःला कार्यप्रवण करा.
१०. सकारात्मक मनोवृत्ती आणि विचारप्रणालीचा अवलंब करा.
११. जसे आपणाला खरोखर व्हायचे आहे, तेच व्हा..
१२. आपल्या मनाला सृजनात्मक आणि सहेतूक कार्याची चांगली सवय लावा.
१३. चांगला श्रोता बना. १४. स्वयंप्रतिष्ठा वाढवा आणि आपली कार्यक्षमता वृध्दिंगत करा.
१५. अधिक कार्यक्षम बनण्यासाठी वेळ आणि परिस्थितीनुसार आपल्या आचणात लवचिकपणा अंगीकारा.
१६. आपला आत्मविश्वास नेहमी जागृत अवस्थेत ठेवा. १७. चांगल्या स्नेहभावाचे व मैत्रीचे जतन करा.
१८. वाईट अनुभवांना विसरुन जा, तथापी ज्या अनुभवांनी आपणाला धडा शिकविला, त्याला विसरु नका.
१९. दुसऱ्यांनी केलेल्या योग्य सूचनेचे स्वागत करा.
२०. आपली सर्जनशीलता वृध्दिंगत करा.
२१. लक्षात असू द्या की, भीती ही माणसाच्या अवनतीचे सर्वांत मोठे कारण आहे.
२२. जीवनात सुव्यवस्थिती व सुनियोजित राहण्याचा प्रयास करा आणि जे कार्य आपण हाती घ्याल, ते तर्कसंगत नियोजनपूर्वक पध्दतीने करण्याचा पुरेपुर प्रयत्न करा.
२३. तुमच्या उपजत कौशल्यांना नेहमी वाव देऊन वृध्दिंगत करा. २४. जीवनात नेहमी आशावादी विचाराने वागा.
२५. एक जबाबदार, सहनशील, निष्ठावान, सत्यप्रिय आणि कर्तव्यदक्ष माणूस व्हा, म्हणजे यश हे आपलेच आहे.
⚡⚡⚡⚡⚡⚡☔☔☔☔☔

📥फार चढ असलेले डोंगर चढण्यासाठी म्हणजेच यशाकडे जाण्यासाठी सुरुवातीला तरी तुमचे पाऊल संथच पडयाला हवे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!