व्यायामशाळेस पैशांसाठी पत्नीस मारहाण : पत्नीला आणण्यास गेलेल्या पतीस जबर मारहाण

व्यायामशाळेस पैशांसाठी पत्नीस मारहाण ; ६ गुन्हा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर –
माहेरहून व्यायाम शाळेसाठी पैसे आणण्यासाठी मारहाण करून मानसिक छळवणूक केल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शुभम राजेश सासवान (पती), संगिता राजेश सारवान (सासू), राजेश रामस्वरुप सारवान (सासरा), रामस्वरुप सारवान (सर्व रा.धोबीघाट आझाम काॅलेजसमोर, कॅन्टोन्मेंटचाळ घर.न.१३, पुणे), सिमा राजेश नकवाल (आत्या सासू), राजेश नकवाल (आत्या सासरा, दोघे रा.चंदननगर, पुणे) आदिंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२७ डिसेंबरच्या पाच दिवसांनंतर ते एप्रिल २०२२ सासरी नांदत असताना सर्वांनी व्यायाम शाळा सुरू करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी वेळोवेळी दमदाटी, शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपाशीपोटी ठेवून मानसिक, शारीरिक छळवणूक केली, या सौ.प्रियंका शुभम सारवान यांच्या फिर्यादीवरून गुरंन.६४६/२०२२ भादविक ४९८(अ),९२३,५०४,५०६,३४ कलमान्वये भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोना एस.बी.आडसूळ हे करीत आहेत.

पत्नीला सासुरवाडीला आणण्यासाठी गेलेल्या पतीला जबर मारहाण
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर –
पत्नीला सासुरवाडीला आणण्यासाठी गेलेल्या पतीला जबर मारहाण झाल्याची घटना रविवारी (दि.२५) फर्याबाग (सोलापूर रोड अहमदनगर) येथे घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रोहित भिंगारदिवे, फ्रान्सिस भिंगारदिवे, रविंद्र बनसोडे, योगीता बनसोडे (सर्व रा.फर्याबाग सोलापूर रोड, अहमदनगर) आदिंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, रविवारी (दि.२५) सासुरवाडी येथे पत्नीला आणण्यासाठी गेलो होतो. यावेळी संबंधित चौघांनी संगनमताने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केलं. जीवे मारण्याची धमकी दिली, उपचारार्थ दाखल रुग्णालयातील रोशन मल्हारी पगारे (रा.शिवछत्रपती, टाॅवरजवळ, दरेवाडी,ता.जि.अहमदनगर) यांच्या जबाबावरून गुरंन ६४५/२०२२ भादविक ३२४,३२३,५०४,५०६,३४ कलमान्वये भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्हे मागे घेण्यासाठी अत्याचार ; ६ जणांवर गुन्हा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
गुन्हे मागे घेण्यासाठी ॲफेडेव्हीट करून दे असे म्हणत, अत्याचार केल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, तक्रार दाखल करणारी महिला व संबंधित यांच्यात यापूर्वी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. दि.२४ डिसेंबरला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अत्याचारीत महिला कामानिमित्ताने कोर्टाजवळून दुचाकीवर जात होती. संबंधितांनी गाडीत येऊन अत्याचारीत महिलेस‌ बळजबरीने गाडीत बसवून, ‘तू आमच्या विरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घे’ असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर काटवनात घेऊन जाऊन संबंधितांनी तू गुन्हे मागे घेण्यासाठी ॲफेडेव्हीट करून दे असे म्हणत संबंधित दोघांनी अत्याचार केला, या दाखल फिर्यादीवरून भादविक ३७६ ड, ३६५, ३२३, ५०४,३४ कलमान्वये भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!