वि.हिं.प.,बजरंग दल व संघाचे स्वयंसेवक अयोध्याधाम यात्रेला रवाना
रामभक्तांचे नगर रेल्वे स्थानक येथे स्वागत रामभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण : दादा ढवाण
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : साडेपाचशे वर्षाच्या प्रतीक्षे नंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण झाले आहे. राम भक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. नगर जिल्ह्याची ही पहिलीच यात्रा असून नगर शहरात मोठ्या उत्साहाने यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामाचे मंदिर व दर्शन होत असल्याने रामभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अधिकारी दादा ढवाण बोलताना म्हणाले. नगर जिल्हा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व रा.स्व.संघाचे स्वयंसेवक अयोध्या धाम यात्रेला श्रीराम मंदिर दर्शनासाठी आस्था विशेष रेल्वेने सकाळी 9 वाजता रवाना झाले. यात्रेकरूंचे नगर रेल्वे स्थानक येथे नगरकरांनी मोठ्या उत्साहात गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अधिकारी दादा ढवाण,विभाग मंत्री सुनील ख्रिस्ती,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, जिल्हा सहमंत्री तथा यात्रा प्रमुख मुकुल गंधे,प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर,मठ मंदिर समितीचे जिल्हाप्रमुख हरिभाऊ डोळसे, दत्ताजी जगताप, भारतीय किसान संघाचे जिल्हा सहमंत्री निलेश चिपाडे, सोमनाथ जाधव, केशव भुजबळ,भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर,प्रशांत मुथा, दत्ता गाडळकर, बाळासाहेब भुजबळ, सचिन पारखी,श्रीराम हजारे, देविदास साळुंखे,कैलासतात्या एरंडे,अशोक चोरमले,रणजीत सुराणा, योगेश आवचरे,रोहन देशपांडे, सुलोचना चव्हाण,भगवान कोल्हे, भाऊसाहेब वाबळे, बाळासाहेब वाघ ,सुभाष सूर्यवंशी, शशिकांत दगडे, बाळासाहेब दळवी आदींसह राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. राम भक्तांची निवास व्यवस्था कारसेवापुरम येथे असेल. दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. या यात्रेचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री संजय मुद्राळे, महेश करपे,निखिल कुलकर्णी, नितीन वाटकर व संकेत राव यांनी केले आहे.