संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : तालुक्यातील मोहटा येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टच्या नूतन विश्वस्तपदी नुकतेच अहमदनगर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वें.यार्लगड्डा यांनी ॲड कल्याण दगडू बडे पा. यांची विश्वस्त म्हणून निवड केली. या निवडीबद्दल ॲड कल्याण बडे पा. यांचा चिंचपूर पांगुळ ग्रामस्थांतर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
ॲड.कल्याण बडे यांनी रविवारी विश्वस्त म्हणून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्यास मोहटादेवी गडावर आले होते. या दरम्यान ॲड बडे पा. हे गावी चिंचपूर पांगुळ येथे आले होते. ॲड कल्याण बडे पा. यांच्या विश्वस्त निवडीबद्दल त्यांचा ज्येष्ठ ग्रामस्थांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन अभिनंदन केले.
यावेळी चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अशोक साळुंके यांच्या हस्ते बडे यांचा शाल,श्रीफळ,देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी विष्णू सोपान बडे,भास्कर अंबिलढगे, ग्रा.प.संगणक चालक गणेश बडे, पत्रकार सोमराज बडे,विक्रम साखरे, मधुकर अंबिलढगे , अशोक बडे, शांतीलाल साळवे, संजय बारगजे, नवनाथ बडे, लक्ष्मण साळवे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
✍संकलन-सोमराज बडे.