संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई -राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर दोन दिवसांतील कामकाजावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी विरोधी पक्षातील आमदारांनी केलेल्या राड्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांच्या अधिवेशनात अतिशय चांगल्या प्रकारे बातम्या आणि सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोहचवल्यामुळे माध्यमांना धन्यवाद दिले. अजित पवार यांनी सांगितले की, विधीमंडळामध्ये सगळ्यात ज्येष्ठ असे थोरात इकडे बसले आहे ते आवाक झाले आहेत ते ३० ते ३७ वर्षांच्या कारकिर्दीत बाळासाहेब थोरात यांना जो अनुभव आला आहे तो मला पहिल्याच वेळेत आला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. म्हणून अनुभवाच्या बाबतीत मी त्यांच्यावरुन वरिष्ठ आहे. काल जे घडलं कोणीही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजीरवाण होते ही आपली संस्कृती, परंपरा नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उत्कृष्ट संसद पटू यांना पुरस्कार देण्याचे कार्यक्रम आहे. हे परिमाण ठरल्यानंतर हल्ली जे चालले आहे ते बघितल्यानंतर कामकाजाचा दर्जा उंचवण्याचे काम आहे की, खालावण्याचे काम आहे. दर्जा खालावत चालला आहे. लोकप्रतिनिधींकडे जनतेची आपेक्षा असते की सामान्यांच्या आयुष्यात चांगला फरक घडला पाहिजे आणि जिथे घडवला जातो तिथे पाठवण्यात आले आहे. परंतु तिथेच जे कृत्य झाले ते मान शरमेनं खाली घालणारे होते. १२ आमदारांना निलंबित केल्यामुळे राज्यपालांच्या १२ आमदारांसह जोडण्यात येत आहे. परंतु असा कोणताही प्रकार नाही आहे जो काही राडा घडला ते सर्वांनी पाहिला आहे. सत्ताधाऱ्यांनी तो घडवला नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.